शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

हाॅटेलमध्ये कोयत्याने वार करून दरोडा घातलेली टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 20:00 IST

साडे तेवीस हजारांचा ऐवज लुटून नेला होता..

सासवड : पुरंदर तालुक्यातील वाघापूर चौफूला येथील हॉटेल महाराजामध्ये दि २७ आॅगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास ५ ते ६ अनोळखी इसमांनी लोखंडी कोयत्याने कामगारांना मारून दहशत पसरवून दरोडा घातलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले आहे.     याबाबत सागर नानासाहेब( उरसळ, रा. सिंगापुर, ता. पुरंदर ) सासवड पोलीस स्टेशनमधे फिर्याद दाखल केली आहे. सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल असून सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे तपास करीत आहेत. ही घटनेत हाॅटेलचे कामगार प्रशांत वसंत बगाडे व प्रथमेश फडतरे यांना कोयत्याने मारहाण करण्यात आली होती व हाॅटेलच्या काऊंटरममधून १६ हजार ७०० रूपये रक्कम तसेच दशरथ वाघमारे व गणेश मंगळवेढेकर यांचा जिओ व विवो कंपनीचे मोबाईल हिसकावून घेवून रू २३ हजार ७०० चा ऐवज दरोडा टाकून चोरून नेला होता.     हा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, उप विभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांना आदेश दिले होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार श्रीकांत माळी, हवालदार चंद्रकांत झेंडे, जगदीश शिरसाठ, राजेंद्र चंदनशिव, पोलीस नाईक राजु मोमीन, गुरू जाधव, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, अमोल शेडगे, अक्षय जावळे यांच्या पथकाला नियुक्त केले हेाते. सदर पथकाला तपास करीत असताना गोपनीय बातमीदारांमार्फत हा गुन्हा  सागर उर्फ नानूभाई नाथू व त्याचे साथीदारांनी केलेला आहे तसेच तो व त्याचे साथीदार हे खंडोबानगर येथे एकत्रित जमलेले आहे अशी माहिती मिळाली.     यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सासवड येथील खंडोबानगर येथे जाऊन सागर उर्फ नानूभाई बबलू नाथु ( वय १९ वर्षे ) रा. खंडोबानगर, सासवड, अनिल उर्फ जग्गू प्रमोद सोळंकी (  वय २० वर्षे), सनी भरत पवार ( वय २० वर्षे ), विकास उर्फ तर्री जितेंद्र मंडले ( वय २० वर्षे ) सर्व रा नाईकवाडा, सासवड यांना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता सागर उर्फ नानूभाई याच्याकडे गुन्हयात गेलेला मोबाईल फोन मिळून आला तसेच सदर गुन्हा त्याने त्याच्या फरार साथीदारांसह केल्याचे निश्पन्न झाल्याने त्यांना पुढील कार्यवाहीकरीता सासवड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले. आरोपींनी सदरचा गुन्हा पैशाची चणचण असल्याने केल्याचे सांगितले. आरोपी हे रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापुर्वी सासवड पोलीस स्टेशनमधे गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरीArrestअटकPoliceपोलिस