शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विवस्त्र करत महिलेवर गँगरेप; FIR मधून अंगावर काटा आणणारी माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 05:56 IST

मणिपूरमध्ये अत्याचारांची परिसीमा; एफआयआरमध्ये अंगावर काटा आणणारी माहिती

इम्फाळ : मणिपूरमध्ये तीन महिलांची विवस्त्र धिंड काढण्याचा जो भीषण प्रकार ४ मे रोजी कंगपोकपी जिल्ह्यातील गावामध्ये घडला, त्याची पोलिसांकडे दाखल झालेल्या एफआयआरमधील माहिती अंगावर काटा आणणारी आहे. अत्याधुनिक शस्त्रे घेतलेले ८०० ते १००० लोक बी फिनोम या गावामध्ये घुसले. त्यांनी लोकांच्या घरांना आग लावली तसेच तीन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली. इतकेच नव्हे त्याचे व्हिडीओही चित्रित केले. मैतेई युवा संघटना, मैतेई लिपून, कांगलेईपाक कनबा लुप, अरामबाई तेंगगोल, विश्व मैतेई परिषद या संघटनांच्या सशस्त्र कार्यकर्त्यांनी गावामध्ये धुमाकूळ घातला. कुकींवरील अत्याचार या व्हि़डीओद्वारे जगासमोर आणण्याचा आमचा उद्देश होता, असे आयटीएलएफने म्हटले आहे. 

महिलांना सर्वांसमोर विवस्त्र केलेया लोकांपासून जीव वाचविण्यासाठी गावकरी जंगलात आश्रयाला गेले. त्यापैकी पाच जणांना मैतेई संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घेरले. त्यात ५६ वर्षे वयाची एक व्यक्ती, त्यांचा १९ वर्षांचा मुलगा, २१ वर्षे वयाची मुलगी तसेच ४२ वर्षे व ५२ वर्षे वयाच्या दोन महिलांचा समावेश होता. त्यातील ५६ वर्षांच्या व्यक्तीची मैतेई जमावाने हत्या केली. त्यानंतर तीन महिलांना सर्व लोकांसमोर विवस्त्र केले.

सर्वांसमोर सामूहिक बलात्कार२१ वर्षे वयाच्या मुलीवर दिवसाढवळ्या सर्वांसमोर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या युवतीच्या धाकट्या भावाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचीही जमावाने हत्या केली, तर  विवस्त्र केलेल्यांपैकी दोन महिलांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने स्वत:ची सुटका करून घेतली व त्यांनी जंगलात पलायन केले. या दोन महिलांचा विवस्त्रावस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ सर्वप्रथम इंडिजिनिअस ट्रायबल लीडर्स फोरम (आयटीएलएफ) या संघटनेकडून व्हायरल झाला. 

संसदेत मणिपूर प्रश्नावरून गदारोळपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मणिपूरमध्ये सुमारे दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निवेदन करण्याची, तसेच नंतर त्यावर चर्चा करण्याची मागणी करत दोन्ही सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज एकदा आणि राज्यसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब केल्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

...अशा प्रकारची शेकडो प्रकरणे घडत असतात

मणिपूरमध्ये महिलांचा विनयभंग करण्यात आला तसेच त्यांची विवस्त्र अवस्थेत धिंड काढण्यात आली. अशा प्रकारची शेकडो प्रकरणे या राज्यात घडत असतात. रोज हिंसक घटना घडत आहेत. विवस्त्र धिंड काढल्याच्या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे.    - एन. बीरेन सिंह, मुख्यमंत्री, मणिपूर

‘ते’ व्हिडीओ काढून टाका मणिपूरमधील महिलांवर झालेले अत्याचार व त्यांची विवस्त्र काढलेली धिंड यांचे व्हायरल झालेले व्हिडीओ काढून टाकावेत, असा आदेश केंद्र सरकारने ट्विटर व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना दिला. अशा घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर असणे अयोग्य असल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला