Gang rape on minor girl: Three arrested with law conflicted child | अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार : विधिसंघर्षग्रस्त बालकासह तिघांना अटक
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार : विधिसंघर्षग्रस्त बालकासह तिघांना अटक

ठळक मुद्देनागपूरनजीकच्या कामठी-कळमना मार्गावरील घटनाचाकूचा धाक दाखवीत मारहाण

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर (कामठी) : कामठी-कळमना मार्गावर निर्जनस्थळी मित्रासोबत गप्पा मारत असलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकासह तिघांना अटक केली आहे. मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचा जिल्ह्यात सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी राणी सती सोसायटी, कळमना येथील अकराव्या वर्गात शिकणाऱ्या तिच्या वर्गमित्रासोबत कामठी-कळमना मार्गावरील लक्की बारच्या बाजूने रात्री ८.३० वाजताच्या सुमारास गप्पा मारत असताना कामठी परिसरातील तीन अज्ञात आरोपी तोंडाला कापड बांधून त्यांच्याजवळ आले. त्यांनी मुलगी आणि तिच्या मित्राला चाकूचा धाक दाखवून नजीकच्या झुडपात नेले. तिथे दोघांनाही निर्वस्त्र करण्यात आले. यानंतर तिन्ही आरोपींनी अल्पवयीन तरु णीच्या गळ्यावर चाकू लावून तिच्यावर पाशवी बलात्कार केला. यातील दोन आरोपींनी पीडित मुलीच्या वर्गमित्राला लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यासोबतच त्याच्याजवळील पाच हजार रु पये किमतीचा मोबाईल व मुलीच्या हातातील चांदीची अंगठी असा मुद्देमाल घेऊन तिन्ही आरोपी कामठीच्या दिशेने पसार झाले.
अल्पवयीन मुलगी व मुलाने आरोपी पसार झाल्यानंतर लागलीच कळमना पोलीस स्टेशन गाठले. कळमना पोलिसांनी घटनास्थळ नवीन कामठी पोलीस स्टेशन येत असल्याचे सांगत, नवीन कामठी पोलीस स्टेशनला जाऊन तक्र ार करण्यास सांगितले. यानंतर या दोघांनी नवीन कामठी पोलीस स्टेशन गाठून रात्री १० वाजताच्या सुमारास नवीन कामठी पोलीस स्टेशनला तक्र ार दाखल केली. पोलिसांनी तातडीने याची दखल घेत रात्रीच घटनास्थळ गाठत आरोपींच्या शोधात परिसर पिंजून काढला. परंतु तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी कलम ३७६ (ड), ३९२, ३२४, ३४ भादंवि पोक्सो २०१२ (बाललैंगिक संरक्षण कायद्यानुसार) गुन्हा दाखल करीत पीडिताला वैद्यकीय चाचणीसाठी मेयो रुग्णालयात दाखल केले.

२० तासात अटक
पीडितेच्या बयानावरून पोलिसांनी तपासचक्रे वेगात हलविली. याप्रकरणी मोहनिस ऊर्फ मिलिंद बोरकर (२६) रा. रमानगर, रेल्वे फाटकजवळ, हुकला ऊर्फ शेख अमीन (३२) रा. अब्दुल्ला शाह बाबा दर्गा परिसर कामठी आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला २० तासात अटक केली. उपरोक्त कारवाई पोलीस उपायुक्त नीलोत्पल, सहायक पोलीस आयुक्त राजरतन बनसोड, नवीन कामठीचे ठाणेदार संतोष बकाल, दुय्यम पोलीस निरीक्षक राधेशाम पाल यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकातील हेड कॉन्स्टेबल पप्पू यादव, मंगेश लांजेवार, मंगेश यादव, राजेंद्र टाकळीकर, सतीश ठाकूर, सुधीर कनोजिया, उपेंद्र कोटकर आदींनी केली.
अल्पवयीन मुलगी व मुलाने आरोपी पसार झाल्यानंतर लागलीच कळमना पोलीस स्टेशन गाठले. कळमना पोलिसांनी घटनास्थळ नवीन कामठी पोलीस स्टेशन येत असल्याचे सांगत, नवीन कामठी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करण्यास सांगितले. यानंतर या दोघांनी नवीन कामठी पोलीस स्टेशन गाठून रात्री १० वाजताच्या सुमारास नवीन कामठी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.

Web Title: Gang rape on minor girl: Three arrested with law conflicted child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.