अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; तीन आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 19:06 IST2020-09-19T18:31:37+5:302020-09-19T19:06:18+5:30
चौघांनी मिळून तिला मरीमातेच्या मंदिराकडे ओढत नेले.

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; तीन आरोपी गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : १५ वर्षीय मुलीवर चार तरुणांनी सामुहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड खुर्द येथे १८ सप्टेंबरला रात्री घडली. जळगाव जामोद पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून १९ सप्टेंबरला पहाटे साडेपाचलाच तीन तरुणांना अटक केलीे. एक जण फरारी आहे.
मडाखेड खुर्द येथील १५ वर्षीय मुलगी शौचासाठी शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास गावाबाहेर गेली होती. तिच्यावर पाळत ठेवून आरोपी सागर मांडोकर, टिल्या उर्फ प्रवीण इंद्रभान भिलंगे (२२), संदीप वसंत जवंजाळ (२७), ज्ञानेश्वर प्रभाकर शित्रे (३५, सर्व रा. मडाखेड खुर्द) या चौघांनी तिला गाठले. चौघांनी मिळून तिला मरीमातेच्या मंदिराकडे ओढत नेले. तिच्यावर अत्याचार केला. घरच्यांना सांगितले तर जीवाने मारण्याची धमकी दिली व तेथून पळून गेले. मुलीने घरी येताच टाहो फोडल्याने घरच्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यावरून तिच्या चुलत भावासह जळगाव जामोद पोलीस ठाण्यात येत तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (ड), ३७६ (डीए), ३७६(२) (जे), (एन), ३६३, १०९, ५०६ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल केला. चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश वळवी, पोलीस कॉन्स्टेबल विकास गव्हाड, पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील, पोलीस कॉस्टेबल सचिन राजपूत करत आहेत.