शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत सामूहिक बलात्कार; महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट, अल्पवयीन मुलीवर ३३ जणांकडून 9 महिने अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 06:05 IST

पीडित मुलगी डोंबिवली ग्रामीण भागात राहते. जानेवारीत तिच्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवीत बलात्कार केला. त्या शरीरसंबंधांचा व्हिडीओ त्याने काढला अन्...

डोंबिवली (जि. ठाणे) : पुणे, मुंबईतील बलात्काराच्या अमानुष घटनांनी समाजमन सुन्न झाले असतानाच गुरुवारी डोंबिवलीतील १५ वर्षांच्या मुलीवर तब्बल ३३ नराधमांनी नऊ महिन्याच्या काळात आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मुलीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी २३ आरोपींना अटक केली. दोघे आरोपी अल्पवयीन  असून उर्वरित आरोपी २० ते ३० वयोगटातील आहेत. काही आरोपी राजकीय पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पीडित मुलगी डोंबिवली ग्रामीण भागात राहते. जानेवारीत तिच्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवीत बलात्कार केला. त्या शरीरसंबंधांचा व्हिडीओ त्याने काढला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकर व त्याच्या मित्रांनी २९ जानेवारी ते २२ सप्टेंबर या काळात पीडितेवर डोंबिवली, बदलापूर, रबाळे, मुरबाड येथे सामूहिक बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी चार विशेष पथके स्थापन केली. १० फरारींचा शोध सुरू आहे. 

महिला पोलीस अधिकाऱ्याकडे तपासगुन्ह्याचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेऊन घटनेचा तपास स्थानिक पोलीस अधिकाऱ्याकडे न सोपवता ठाणे विभागाच्या महिला सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

पीडितेची वैद्यकीय चाचणी; प्रकृती स्थिरडोंबिवलीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीला कळवा येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

पार्टीच्या नावाखाली व्हायचा लैंगिक छळ- पीडित मुलीची आरोपींपैकी दोन तरुणांशी मैत्री होती. यातील एक तिचा प्रियकर असून, त्याने लग्नाचे आमिष दाखवीत तिच्यावर बलात्कार केला. या वेळी काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, त्याने व त्याच्या मित्राने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.- यानंतर या दोघांनी संबंधित व्हिडीओच्या आधारे त्या मुलीस धमकावून वेगवेगळ्या ठिकाणी अन्य मित्रांच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या नावाखाली तिला बोलावून बलात्कार करण्याकरिता मित्रांच्या हवाली केले. या वेळी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार करण्यात आला.

बलात्कारासह पोक्सोअंतर्गत गुन्हा -मानपाडा पोलीस ठाणे येथे ३७६, ३७६ (एन), ३७६ (३), ३७६ (ड) (अ)सह पोक्सो कायदा कलम ४.६.१० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराची घटना निंदनीय आहे. या प्रकरणासंदर्भात कठोर कारवाई करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत.    - एकनाथ शिंदे, पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणेMolestationविनयभंगPoliceपोलिसEknath Shindeएकनाथ शिंदेCrime Newsगुन्हेगारी