शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: डॉक्टरच्या घरावर छापा टाकणाऱ्या तोतया आयकर अधिकाऱ्यांची टोळी कोल्हापूरची, तरुणीसह तिघे जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:15 IST

चौघांचा शोध सुरु, सर्व दागिने व रोकड हस्तगत, पोलिसांना ४८ तासांत यश

सांगली : प्राप्तिकर अधिकारी असल्याचे भासवून कवठेमहांकाळ येथील डॉक्टरांच्या घरावर छापा टाकणाऱ्या टोळीतील तिघांना पोलिसांनी जेरबंद केले. यामध्ये एका तरुणीचा समावेश आहे. त्यांनी नेलेली रोकड व सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या ४८ तासांत गुन्ह्याचा छडा लावला.एकूण सात जणांच्या टोळीने ही बोगस छापेमारी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यातील दीक्षा राष्ट्रपाल भोसले (वय २५, रा. काकडे पार्क, चिंचवड, पुणे), पार्थ महेश मोहिते (वय २५, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) आणि साई दीपक मोहिते (वय २३, रा. प्रगतीनगर, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून १५ लाख ५ हजार रुपयांची रोकड आणि १ किलो ४१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व बिस्किटे हस्तगत करण्यात आली. उर्वरित चौघा संशयितांची नावे अशी : महेश रघुनाथ शिंदे (रा. जयसिंगपूर, सध्या रा. घाटकोपर, मुंबई), अक्षय लोहार (रा. संकेश्वर, जि. बेळगाव), शकील पटेल (रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) आणि आदित्य मोरे (रा. रुकडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हे चौघेही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांना जेरबंद करण्यात लवकरच यश येईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.गेल्या रविवारी (दि. १४) रात्री ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान तीन पुरुष व एका महिलेने आपण मुंबईतील प्राप्तिकर कार्यालयातील अधिकारी असल्याचे भासवून डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या गुरुकृपा रुग्णालय व राहत्या घरावर छापा टाकला आणि घरात ठेवलेली रोकड, सोन्याचे दागिने व बिस्किटे घेऊन ते पसार झाले होते.

पोलिसांचे ४८ तास अविश्रांत परिश्रम..छाप्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली करत संशयितांचा माग काढला. त्यांची रेखाचित्रे तयार केली. ही रेखाचित्रे व तांत्रिक माहितीच्या आधारे सात संशयितांपैकी चौघांपर्यंत पोहचले. सुरुवातीला दीक्षा भोसले पोलिसांच्या हाती लागली. तिने साथीदारांचा ठावठिकाणा सांगितला. त्यानुसार उर्वरित सहा जणांपैकी पार्थ मोहिते व साई मोहिते यांना सापळा रचून हातकणंगले येथून पोलिसांनी जेरबंद केले.