शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात एटीएम फोडण्याच्या तयारीने आलेली टोळी जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 15:18 IST

लक्ष्मी नारायण चित्रपटगृहाजवळील एटीएम फोडण्याच्या तयारीत असलेल्या ७ जणांच्या टोळीला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे़. 

पुणे : लक्ष्मी नारायण चित्रपटगृहाजवळील एटीएम फोडण्याच्या तयारीत असलेल्या ७ जणांच्या टोळीला दत्तवाडी पोलिसांनीअटक केली आहे़. सुमित ऊर्फ नव्या भरत दिघे (वय १९, रा़ पर्वती दर्शन), महेश ऊर्फ मिठ्या राजेंद्र नवले (वय २१), सौरी सुनिल येणपुरे (वय २२), धनंजय नारायण अडागळे (वय १८, रा़ पदमावती), प्रसाद जनार्धन मुसळे (वय २१, रा़ पर्वती दर्शन) अमर लक्ष्मण गायकवाड (वय २०, रा़ जनता वसाहत) आणि यश रामदास उकरंडे (वय १८, रा़ धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. यातील ५ जणांवर यापूर्वी मारामारी व चोरीचे गुन्हे स्वारगेट, दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, लक्ष्मी नारायण चित्रपटगृहाजवळील बोळात हे सर्व जण हत्यारे घेऊन थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़. पोलिसांनी त्यांना चारही बाजूने घेरुन पकडले़ त्यांच्याकडील बॅगेत चार कोयते, एक कटावणी, रस्सी, लोखंडी रॉड, मिरची पावडर असा माल मिळाला़. आश्रय हॉटेलजवळील बँक ऑफ इंडियाचे एटीएमवर दरोडा टाकून ते फोडून लुटण्याचा त्यांचा बेत होता़. पोलीस उपनिरीक्षक ए़ जी़ डफळ अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस