शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

काय हे! पोलीस, शिक्षक, वनाधिकारी खेळत होते जुगार, पोलिसांनी टाकला छापा आणि केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 21:13 IST

Raid in Yavatmal : आठ आरोपी : सव्वातीन लाखांचा मुद्देमाल, दारव्हा पोलिसांची कारवाई

ठळक मुद्देदारव्हा एसडीपीओ उदयसिंह चंदेल, ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात एपीआय अमोल सांगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दारव्हा (यवतमाळ): दारव्हा पोलिसांनी शनिवारी तालुक्याच्या उमरी इजारा येथील शेतशिवारात धाड घालून आठ जुगाऱ्यांना अटक केली. त्यामध्ये अमरावती येथे कार्यरत एक पोलीस कर्मचारी, येथील शिक्षक व वन कर्मचाऱ्याचा समावेश आहे. 

आरोपींकडून ३१ हजार रुपये रोख, सहा मोबाईल, चार दुचाकी वाहने, एक चारचाकी वाहन असा सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींमध्ये अभिनंदन दुलसिंग राठोड (३५) रा. आरंभी ता. दिग्रस, दादाराव श्यामराव पवार (६०) रा. खेड ता. दारव्हा, पांडुरंग भीका राठोड (५०) रा. आरंभी ता. दिग्रस, नरेश तुळशीराम माहुरे (३५) रा. लाखखिंड ता.  दारव्हा, शकील बेग येनूरबेग (५०) रा. पळशी ता. दारव्हा, भास्कर गुलाब काटे (४८)रा. लाखखिंड ता. दारव्हा, इंद्रजीत बळीराम राठोड रा. उमरीईजारा व अभिमन्यू बाबाराव आडे (४७) रा. उमरी इजारा ता. दारव्हा जि. यवतमाळ यांचा समावेश आहे. यातील अभिनंदन हा वन कर्मचारी, भास्कर हा शिक्षक तर इंद्रजीत हा पोलीस कर्मचारी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दारव्हा एसडीपीओ उदयसिंह चंदेल, ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात एपीआय अमोल सांगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीraidधाडPoliceपोलिसArrestअटकYavatmalयवतमाळTeacherशिक्षक