गोवंडीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 07:33 IST2022-01-24T07:32:20+5:302022-01-24T07:33:00+5:30
झोपडपट्टीतील एका उघड्या रिकाम्या घरातील पोटमाळ्यावर नेत तिच्यावर चौकडीने सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर, तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला

गोवंडीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला अटक
मुंबई : गोवंडीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. याप्रकरणी दोन अल्पवयीन आरोपीसह चार जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. तक्रारदार तरुणी कॅटरिंगचे काम करून घरी जात असताना पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने कामानिमित्ताने बोलायचे असल्याचे सांगून तरुणीला सोबत नेले.
झोपडपट्टीतील एका उघड्या रिकाम्या घरातील पोटमाळ्यावर नेत तिच्यावर चौकडीने सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर, तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. शनिवारी एका अल्पवयीन तरुणासह दोघांना ताब्यात घेतले. त्यापाठोपाठ रविवारीही फरार दुकलीवर कारवाई केली. यामध्ये आतापर्यंत दोन अल्पवयीन मुलांसह चौघाना ताब्यात घेत कारवाई केली आहे. यात, साजिद मलिक आणि रमजान कुरेशी अशी अटक आरोपींंची नावे आहेत.