शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी जागेत लॉज बांधकामाची तक्रार करणाऱ्यावर महसूल अधिकाऱ्यांसमक्ष हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 20:43 IST

विशेष म्हणजे महसूल अधिकाऱ्यांनी या वेळी बघ्याची भूमिका घेतली. 

ठळक मुद्देमीरा गाव येथील महाजन वाडी मध्ये सरकारी जागेत महाविष्णू मंदिर आहे. याच मंदिराच्या बांधकामात  सोना नावाने बेकायदा लॉज चे बांधकाम चालवले होते. या प्रकरणी काही तक्रारदारांनी तक्रारी चालवल्या होत्या.

मीरारोड - सरकारी जागेत बेकायदा लॉजिंगचे बांधकाम केल्याची तक्रार करणाऱ्या तक्रादारावर मंडळ अधिकारी, तलाठी आदींच्या समोरच प्राणघातक हल्ला लॉज चालकांनी केल्याची घटना काशिमीरा येथे घडली आहे. विशेष म्हणजे महसूल अधिकाऱ्यांनी या वेळी बघ्याची भूमिका घेतली. मीरा गाव येथील महाजन वाडी मध्ये सरकारी जागेत महाविष्णू मंदिर आहे. याच मंदिराच्या बांधकामात  सोना नावाने बेकायदा लॉज चे बांधकाम चालवले होते. या प्रकरणी काही तक्रारदारांनी तक्रारी चालवल्या होत्या. एका संस्थेच्या माध्यमातून इरबा कोनापुरे यांनी सुद्धा तक्रार केली होती. महापालिकेचे अधिकारी सदर बेकायदेशीर बांधकामा वर कारवाई करण्यास चालढकल करत होते. तर  सरकारी जागा असून देखील महसूल विभागाने सुद्धा डोळेझाक चालवली होती. इरबा यांनी पाठपुरावा चालवल्याने आज गुरुवारी मंडळ अधिकारी दीपक अनारे, तलाठी अभिजित बोडके सह मोहन, जितू, विलास हे लॉज ची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी तक्रारदार इरबा यांना सुद्धा बोलावून घेतले. अनारे हे तलाठी व सोबतच्या व्यक्तींसह मोजमाप घेऊन कागदपत्रे तपासू लागले. त्यावेळी आलेल्या लॉज चालक श्याम कोरडे, योगेश गौडा व त्यांच्या साथीदारांनी शिवीगाळ करत इरबा वर हल्ला चढवला. त्यांना मारहाण करत खाली नेण्यात आले. तेथे एका गाळ्यात  डांबून मारहाण करण्यात आली. इतका सगळा प्रकार होत असताना अनारे, बोडके आदींनी बघ्याची भूमिका घेतली. पोलीसांना सुद्धा पाचारण केले नाही. लॉजवाल्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून काशिमीरा पोलीस ठाणे गाठले. इरबा यांना जबर मारहाण झाली असून अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणी जबाब नोंदवण्याची कार्यवाही करत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRevenue Departmentमहसूल विभागmira roadमीरा रोड