शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

५ वर्षाच्या मुलासमोर पतीने झोपेतच पत्नीची चाकूने भोसकून,गळा आवळून केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 15:45 IST

Murder Case : शिवाजीनगर सारख्या उच्चभ्रू वस्तीत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमेघना रविराज चौधरी (३०) रा. पिंपळगाव ता. पुसद असे मृत महिलेचे नाव आहे. ती पती रविराज रमेश चौधरी (३५) याच्यासह यवतमाळातील शिवाजीनगर स्थित नंणदेच्या घरी आली होती.

यवतमाळ : येथील शिवाजीनगरमध्ये बहिणीच्या घरी पाहूण पणाला आलेल्या भावाने त्याच्याच पत्नीचा चाकूने भोसकून व नंतर गळा आवळून खून केला. ही घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर घडली. या सर्व घटनेचा पाच वर्षाचा मुलगा प्रत्यक्षदर्शी आहे. शिवाजीनगर सारख्या उच्चभ्रू वस्तीत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

मेघना रविराज चौधरी (३०) रा. पिंपळगाव ता. पुसद असे मृत महिलेचे नाव आहे. ती पती रविराज रमेश चौधरी (३५) याच्यासह यवतमाळातील शिवाजीनगर स्थित नंणदेच्या घरी आली होती. आरोपी रविराज चौधरी याचा दोन महिन्यापूर्वी अपघात झाला होता. त्यात त्याच्या डोक्याला इजा झाली. त्यासाठी त्याच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्याच्याच अनुषंगाने चौधरी दाम्पत्य बहीण जावई उमेश ठाकरे यांच्याकडे आले होते. बुधवारी मध्यरात्री मेघना पती रविराज व पाच वर्षाचा मुलगा अगस्त्य हे एका खोलीत झोपले होते. मध्यरात्रीनंतर आरोपी रविराजने पत्नीला झोपेतच चाकूने भोसकले. तिच्या पाठीवर, हातावर व पोटावर चाकूने वार केेले. नंतर तिचा गळा आवळून खून केला. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. उमेश ठाकरे यांनी घटनेची माहिती अवधूतवाडी पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी तत्काळ घटना स्थळ गाठत आरोपी रविराज रमेश चौधरी (३५) याला अटक केली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर, ठाणेदार मनोज केदारे यांनी भेट दिली. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण करीत आहे.

खुनात वापरले दोन चाकू

आरोपीने खुनात दोन चाकूचा वापर केला. घटनास्थळी आरोपी व त्याच्या पत्नीमध्ये झटापट झाली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. या झटापटीत एक चाकू वाकला. त्यानंतर आरोपीने दुसऱ्या चाकुने वार केल्याचे सांगितले जाते. नंतर आरेापीने पत्नी मेघनाचा गळा आवळला. संशयावरूनच ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळPoliceपोलिसArrestअटक