इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात, मुलीला भेटायला बोलवून केला अत्याचार

By काशिराम म्हांबरे | Updated: June 19, 2023 11:48 IST2023-06-19T11:46:57+5:302023-06-19T11:48:30+5:30

संशयित युवक बारावीचा विद्यार्थी, बालसुधारगृहात रवानगी

Friendship on Instagram became expensive as the girl was assaulted by being invited to meet her | इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात, मुलीला भेटायला बोलवून केला अत्याचार

इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात, मुलीला भेटायला बोलवून केला अत्याचार

काशीराम म्हांबरे/म्हापसा: एका अल्पवयीन मुलीशी इन्स्टाग्रामवर मैत्री करून नंतर तिला भेटालया बोलवून तिच्याशी लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या युवकाची मेरशे येथील सुधारगृहात रनावगी करण्यात आली आहे. संशयित युवक हा बारावीचा विद्यार्थी आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार हा प्रकार शुक्रवार १६ ते शनिवार १७ जून दरम्यान घडला. काही महिन्यांपूर्वी संशयित युवकाची पिडीत मुलीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. कालांतराने ते एकमेकांना भेटू लागले. या भेटीचा युवकाने गैरफायदा घेतला. पीडितेला शुक्रवारी (१६ रोजी) वाढदिवसाच्या पार्टी निमीत्त एका हॉटेलवर नेले. त्यानंतर युवकाने हॉटेलातील खोलीत पीडितेवर लैंगिक अत्याचार केला.

घडलेला प्रकार नंतर पीडितेने आपल्या घरी सांगितला. तिच्या घरच्यांनी लगेच म्हापसातील पोलीस  स्थानकावर तक्रार दाखल केली. या प्रकरणी भा. दं.सं. च्या कलम ३६३, ३७६ (३) गोवा बाल कायदा कलम ८ (२)  तसेच पॉस्को कायदा ४, ६, ८, १२ कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.

Web Title: Friendship on Instagram became expensive as the girl was assaulted by being invited to meet her

टॅग्स :goaगोवा