फ्रेंडशिप, लव्ह अन् अकाली ओढविली प्रेग्नेंसी; सोनोग्राफीतून फुटले बिंग

By प्रदीप भाकरे | Updated: December 18, 2022 13:23 IST2022-12-18T13:22:22+5:302022-12-18T13:23:17+5:30

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी तरूण फरार

Friendship, Love and Untimely Pregnancy; Bing burst from sonography | फ्रेंडशिप, लव्ह अन् अकाली ओढविली प्रेग्नेंसी; सोनोग्राफीतून फुटले बिंग

फ्रेंडशिप, लव्ह अन् अकाली ओढविली प्रेग्नेंसी; सोनोग्राफीतून फुटले बिंग

अमरावती - अजाणत्या वयात प्रेमात पडलेल्या एका अल्पवयीन मुलीला लैंगिक अत्याचारातून गर्भधारणा झाल्याचा प्रकार अंजनगाव सुर्जी तालुक्यात घडला. २ ऑगस्ट ते १४ डिसेंबर या कालावधीत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. पिडीत मुलगी ही केवळ १५ वर्ष ४ महिने वयाची आहे. याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी आरोपी शंकर पाटील (२० रा. अंजनगाव सुर्जी) विरुध्द बलात्कार व पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. १७ डिसेंबर रोजी सकाळी पिडिताने अंजनगाव सुर्जी पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. फ्रेंडशिप, लव्ह अन् अकाली ओढविली प्रेग्नंसी असा हा प्रकार ऐकून पोलीस देखील चक्रावले.

तक्रारीनुसार, पिडित मुलगी ही १५ वर्ष ४ महिन्यांची आहे. ती नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना, एक दिवशी आरोपी शंकर पाटील हा शाळेच्या रस्त्यावर उभा होता. यावेळी शंकरने पिडीतेचे नाव गाव विचारुन तिच्याशी मैत्री केली. काही दिवसांनी त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांमध्ये सोशल संवाद वाढला. गाठीभेटीही वाढल्या. तिच्या अजाणत्या वयाचा गैरफायदा घेत, शंकरने पिडीतेच्या मर्जीविरुध्द तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. भीतीपोटी पिडीताने या संदर्भात काेणालाही सांगितले नाही वा कुठेही वाच्यता केली नाही. यानंतर शंकरने पिडीतावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, १४ डिसेंबर रोजी तिची प्रकृती बिघडल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला दवाखान्यात नेले. तेथे पिडीताची सोनोग्राफी करण्यात आली यावेळी ती गर्भवती असल्याचे लक्षात आले. सबब, तिच्या कुटुंबियांच्या पायाखालची वाळू सरकली. पिडीताने अखेर स्वत:वर झालेल्या अत्याचाराचा खुलासा केला. अखेर तिच्या तक्रारीवरून शंकर पाटील याच्याविरुध्द अंजनगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

१५ वर्षे चार महिने वयाच्या पिडिताच्या बयाणावरून आरोपीविरूध्द बलात्कार, पॉक्सो, धमकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी फरार झाला आहे. त्याच्या शोधार्थ पथक पाठविले आहे. - दीपक वानखडे, ठाणेदार, अंजनगाव सुर्जी

Web Title: Friendship, Love and Untimely Pregnancy; Bing burst from sonography