शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

चेन्नईत मित्राचा खून, नालासोपाऱ्यात अडकला, फरार आरोपीला ५ वर्षांनंतर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 14:38 IST

वालीव पोलिसांनी बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपी रघू मंडल हा वसईतील कंपनीमध्ये काम करीत असल्याची माहिती मिळवली त्याला  ताब्यात घेतले.

नालासोपारा : चेन्नईत मित्राचा खून करून पळून गेलेल्या भूमिगत आरोपीला ५ वर्षांनंतर वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तामिळनाडू पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. चेन्नईस्थित तम्बरम शहरातील टी - १९ केलमबक्कम पोलिस ठाण्यातील हत्येच्या दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी रघू दूघई मंडल याचा तामिळनाडू पोलिस मागील ५ वर्षांपासून सातत्याने शोध घेत होते. वालीव पोलिसांनी बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपी रघू मंडल हा वसईतील कंपनीमध्ये काम करीत असल्याची माहिती मिळवली त्याला  ताब्यात घेतले.ही कामगिरी  उपायुक्त पोर्णिमा चौगुले -श्रींगी,  सहायक आयुक्त चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वालीवचे वरिष्ठ  निरीक्षक कैलास बर्वे,  निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार पाटील तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलिस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, सचिन दोरकर, राजेंद्र फड, सतीश गांगुर्डे, अभिजित गढरी यांनी पार पाडली आहे.

नेमकी घटना काय?आरोपी रघू मंडल व त्याचा मित्र अनिल चौधरी हे दोघे चेन्नईतील कंपनीत एकत्र काम कामाला होते. तसेच एकाच रूममध्ये राहात होते;  कालांतराने दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून भांडण झाले. त्याचा राग धरून १४ सप्टेंबर २०१८ रोजी रात्री रघू मंडलने अनिलचा धारदार चाकूने गळा कापून खून केला होता. तामिळनाडू पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याच्या तपासात आरोपीने केलेल्या गुन्ह्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस