शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : दारू आणण्यासाठी दुचाकी न दिल्याने मित्रानेच केला मित्राचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 12:12 IST

Crime News : संशयितास अटक : चिकनच्या हातगाडीवर सोबत केले मद्यप्राशन

ठळक मुद्देदारु आणण्यासाठी काल्याने अरुण याला दुचाकी मागितली, परंतु अरुणने त्यास नकार दिला. त्यामुळे काल्या याला त्याचा राग आला व त्यातून तो अरुणला शिवीगाळ करुन मारहाण करायला लागला.

जळगाव : दारु आणण्यासाठी दुचाकी न दिल्याच्या रागातून मित्राने मित्राचा खून केल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजता शिवाजी नगरातील बौध्द विहारजवळ घडली. अरुण हरी पवार (४०, रा.के.सी.पार्क, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून संशयित सचिन उर्फ काल्या मंगल अटवाल (रा.इंद्रप्रस्थ नगर) याला अटक करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश मधुकर जोहरे (राधाकृष्ण नगर), नवल मधुकर सपकाळे (के.एच.पार्क), सचिन उर्फ काल्या मंगल अटवाल व अरुण हरी पवार (रा.के.सी.पार्क) या चौघांनी सोमवारी रात्री १० वाजता शिवाजी नगरातील बौध्द विहारजवळ असलेल्या चिकनच्या हातगाडीवर सोबत मद्य प्राशन केले. आणखी दारु आणण्यासाठी काल्याने अरुण याला दुचाकी मागितली, परंतु अरुणने त्यास नकार दिला. त्यामुळे काल्या याला त्याचा राग आला व त्यातून तो अरुणला शिवीगाळ करुन मारहाण करायला लागला. त्यात त्याने जवळच असलेली फरशी अरुणच्या डोक्यात टाकली. प्रचंड रक्तबंबाळ झालेल्या अरुणला इतर मित्रांनी तातडीने जवळच असलेल्या डॉक्टरकडे नेले नंतर परत त्याच जागेत आणून सोडले. त्यानंतर नवल सपकाळे याने अरुणचे घर गाठून पत्नी रत्नाबाई हिला वादाची माहिती दिली.

चार दवाखाने फिरविलेया घटनेची माहिती मिळाल्यानंतर रत्नाबाई पवार हिने भाचा आकाश कैलास पाटील, शेजारी कुंदन वसंत निकम, मंगेश जोहरे, अभिराज उर्फ गौरव विश्वास चव्हाण यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले.  रिक्षात टाकून अरुण याला जिल्हा रुग्णालय, तेथून खासगी रुग्णालयात नेले. नंतर देवकर रुग्णालयात नेले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. दरम्यान, पत्नी रत्नाबाई हिच्या फिर्यादीवरुन सचिन उर्फ काल्या मंगल अटवाल याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काल्याला रात्रीच पोलिसांनी इंद्रप्रस्थ नगरातून अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनJalgaonजळगाव