शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्स‌ॲप लॉटरीच्या नावावर फसवणुकीचा फंडा, २५ लाख जिंकल्याचा फेक मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 06:50 IST

Crime News : या मेसेजमध्ये काैन बनेगा करोडपतीच्या वतीने ही रक्कम आपण जिंकली आहे, असेही सांगितले जात आहे.

नागपूर : सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी नवनवीन पद्धती शोधत असतात. सध्या व्हॉट्स‌ॲपकडून आपल्याला २५ लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचे फेक मेसेज पाठवून लोकांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मेसेजमध्ये काैन बनेगा करोडपतीच्या वतीने ही रक्कम आपण जिंकली आहे, असेही सांगितले जात आहे. अशा फेक मेसेजपासून वेळीच सावध होण्याचे आवाहन सायबर क्राइम विभागाने केले आहे.अनेकांच्या मोबाइलवर अनोळखी व्यक्तीच्या मोबाइल नंबरवरून एक मेसेज पाठविला जात आहे. यासोबतच एक व्हिडीओसुद्धा आहे. यातील व्यक्ती सांगतो की, ‘मी व्हॉट्स‌ॲपचे मुख्य कार्यालय दिल्ली येथून बोलत आहे. तुम्हाला व्हॉट्स‌ॲपची २५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. ही लॉटरी कशी लागली याची माहिती देताना तो म्हणतो, व्हॉट्स‌ॲपतर्फे आंतरराष्ट्रीय लकी ड्राॅ काढण्यात आला होता. पाच देशांचा लकी ड्राॅ काढण्यात आला. यात तुमचा व्हॉट्स‌ॲप नंबर पहिल्या नंबरवर आल्याने तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागली. ही २५ लाखांची रक्कम मुंबईतील स्टेट बँकेत पोहोचली आहे. ही रक्कम काढण्यासाठी मी तुम्हाला एक नंबर सेंड केला आहे. तो बँक व्यवस्थापकाचा नंबर असून, तो आपल्या व्हॉट्स‌ॲपमध्ये सेव्ह करून त्याला फोन करा आणि २५ लाख रुपयांच्या लॉटरीबाबत विचारा. लॉटरीचा नंबर विचारला तर त्याचा नंबरही पाठविला असून तो सांगा. कॉल मात्र व्हॉट्स‌ॲपद्वारेच करा, असे तो आवर्जून सांगतो. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक लोक इतरांना सावध करण्यासाठीसुद्धा ते पाठवून हे फेक असून कुणीही याला बळी पडू नये, असे आवाहन करीत आहेत. पोलिसांनी यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप