' डेटींग ' अ‍ॅपवरील मैत्री पडली महागात; लग्नाच्या आमिषाने महिलेला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 08:07 PM2019-08-31T20:07:31+5:302019-08-31T20:10:02+5:30

महिलेचा अश्लिल व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली.

fraud with women from friendship on Dating app | ' डेटींग ' अ‍ॅपवरील मैत्री पडली महागात; लग्नाच्या आमिषाने महिलेला गंडा

' डेटींग ' अ‍ॅपवरील मैत्री पडली महागात; लग्नाच्या आमिषाने महिलेला गंडा

googlenewsNext

पिंपरी : 'डेटींग' अ‍ॅपवरून झालेली मैत्री एका महिलेला महागात पडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून मोबाइलमध्ये महिलेचे अश्लिल फोटो काढले. त्यानंतर बदनामीची धमकी देत महिलेकडून ९३ हजार रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल प्रमोद आरोरा (रा. जालंदर, पंजाब) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी २९ वर्षीय महिलेने सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 
फिर्यादी महिला आणि आरोपी साहिल आरोरा यांची डेटींग अ‍ॅपवरून ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यातून विश्वास संपादन करून आरोपीने साहिल याने महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर महिलेकडून ऑनलाइन ९३ हजार रुपये घतेले. फिर्यादी महिलेचा अश्लिल व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

Web Title: fraud with women from friendship on Dating app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.