कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने ११ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 11:18 IST2025-12-23T11:16:08+5:302025-12-23T11:18:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : खासगी वित्तसंस्थेत कार्यरत असलेल्या सीमा होवाळ (४९) यांची कर्ज मंजुरीच्या नावाखाली तब्बल ११ लाख ...

कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने ११ लाखांची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खासगी वित्तसंस्थेत कार्यरत असलेल्या सीमा होवाळ (४९) यांची कर्ज मंजुरीच्या नावाखाली तब्बल ११ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. तोतया बँक व्यवस्थापक व एजंटने संगनमताने ही फसवणूक केली असून, बीकेसी पोलिसांनी १९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.
होवाळ या अंधेरीच्या अर्बन फायनान्स प्रा. लि.मध्ये कार्यरत असून, शासकीय व खासगी बँकांमधून कर्ज मंजुरीसाठी फाईल तयार करण्याचे काम करतात. कामाच्या अनुषंगाने त्यांची ओळख हिमांशू सावला व अभिजित या एजंटांमार्फत संजय पांडेशी झाली. पांडेने कॅनरा बँक (बीकेसी) व आयसीआयसीआय बँकेतील अधिकाऱ्यांशी जवळीक असल्याचा दावा करत मोठ्या रकमेची कर्जे मंजूर करून देतो, असे सांगितले. सप्टेंबर २०२५ मध्ये प्रभाकर मिश्रा या एजंटने त्यांचा मालक असलेले बांधकाम व्यावसायिक संजय मिश्रा यांना सुमारे १०० कोटी रुपयांच्या कर्जाची आवश्यकता असल्याचे होवाळ यांना सांगितले.
पांडेने कॅनरा बँकेकडून १०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे बनावट पत्र व्हॉट्सॲपवर पाठवून कर्जासाठी १० टक्के रक्कम भरण्याची अट घातली.
मात्र, एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नसल्याचे संजय मिश्रा यांनी सांगितल्यानंतर पर्याय शोधण्याचे आश्वासन दिले. मुंबईत येण्यासाठी पांडेने विमान तिकीट मागितले. त्यानुसार २ डिसेंबर रोजीचे लखनौ-मुंबई तिकीट बुक केले. मुंबईत आल्यानंतर त्याने कायदेशीर खर्चासाठी ६० हजार रुपयांची मागणी केली.