नवविवाहितेकडून गरिबीचे नाटक करून फसवणूक, भिवंडीतील तीन महिलांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 05:06 AM2021-04-15T05:06:42+5:302021-04-15T05:07:32+5:30

Fraud : रीना देवरे (२३) असे गरिबीच्या नावाने लग्न करून तरुणांना लुटणाऱ्या तरुणीचे नाव आहे.

Fraud by newlyweds pretending to be poor, charges filed against three women in Bhiwandi | नवविवाहितेकडून गरिबीचे नाटक करून फसवणूक, भिवंडीतील तीन महिलांवर गुन्हा दाखल

नवविवाहितेकडून गरिबीचे नाटक करून फसवणूक, भिवंडीतील तीन महिलांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

भिवंडी : फसवणुकीच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला नेहमीच घडतात. मात्र, वेगवेगळ्या तरुणांशी गरिबीच्या नावाने लग्न करून त्यांच्याकडून पैसे व दागिने घेऊन नवविवाहित वराची फसवणूक झाल्याचा प्रकार भिवंडीत समोर आला आहे. गरिबीच्या नावाने लग्न करून तरुणांना लुटल्याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी भामट्या तरुणीसह तिच्या आईला व त्यांची आणखी एक महिला साथीदार अशा तिघींना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. रीना देवरे (२३) असे गरिबीच्या नावाने लग्न करून तरुणांना लुटणाऱ्या तरुणीचे नाव आहे.
तरुणीची आई मंगला देवरे व मावशी सुनीता माहिरे यांच्या मदतीने रीना हिचे आईवडील नाही. ती खूप गरीब आहे, अशी खोटी माहिती सांगून रीनाचे लग्न लावत असत. मात्र, लग्न झाल्यानंतर रीना आपल्या पतीला वेगवेगळी खोटी कारणे सांगून पळून जायची. जाताना लग्नात नवरदेवाने दिलेले पैसे व दागिने घेऊन जायची. वेगवेगळ्या ठिकाणचा खोटा पत्ता त्या प्रत्येकवेळी देत असल्याने सापडत नव्हत्या. ३० मार्च रोजी भादवड येथील हरेश पाटील याच्याशी तिचा चौथा विवाह झाला. ३० मार्च रोजी ती भादवड येथील हरेश याच्या घरी आली, तिथे विवाहही झाला. सुरुवातीला तिने हरेशकडून पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर लग्नाच्या खरेदीसाठी ४० हजार घेतले व त्यानंतर २९ मार्च रोजी हळदीच्या दिवशी आईला कोरोना झाला, असे सांगून ५० हजार रुपये खात्यात जमा करून घेतले.
रीना व तिच्या आईने तिचा पाचवा विवाह धुळे येथील एका तरुणासोबत जमविला होता. या तरुणाकडून रीनाने ६० हजार रुपये घेतले होते. त्याच्याशी विवाह करायचा असल्याने रीना हिने माहेरी जाण्याचा हट्ट धरला होता. त्यासाठी पतीला आईची तब्येत बरी नसल्याचे कारण सांगितले. मात्र, पतीने मीही सोबत येतो, असे सांगितल्यानंतर रीना हिने त्यास नकार दिला व विनाकारण भांडण करण्यास सुरुवात केली. अखेर, पत्नीच्या वागण्याचा हरेश याला संशय आल्याने त्याने मंगळवारी थेट शांतीनगर पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. पोलिसांनी रीना, मंगला व सुनीता यांना ताब्यात घेतले असता फसवणुकीचा प्रकार समोर आला. त्यांना न्यायालयात हजर केले असता १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Fraud by newlyweds pretending to be poor, charges filed against three women in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.