शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील प्लॉट खरेदी-विक्रीच्या नावाखाली फसवणूक; पाच लाखांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 15:06 IST

अकोला : नागपूर येथील रेवती असोसिट्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सने नागपूर जिल्ह्यातील कान्होलीबारा शेतशिवारातील प्लॉट किस्तीद्वारे विक्रीस असल्याची जाहिरात देऊन अकोल्यातील ग्राहकाची तब्बल पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्यामुळे ग्राहक मंचाने सदर ग्राहकास रेवती असोसिएट्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सने पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

ठळक मुद्देआनंद गोमाजी चव्हाण रा. गायत्री नगर यांनी या दोघांची भेट घेऊन २१ डिसेंबर २०११ रोजी १ हजार ७४३ चौरस मीटर प्लॉट खरेदीचा व्यवहार केला. ४ लाख ३५ हजार ९०२ रुपये बँक आॅफ इंडियाच्या शाखेतून दर महिन्याच्या किस्तीद्वारे रेवती असोसिट्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सकडे जमा केले. त्यानंतरही खरेदी करून न दिल्याने चव्हाण यांनी धनादेश बँकेत वटविण्यासाठी लावला असता तो परत आला.

अकोला : नागपूर येथील रेवती असोसिट्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सने नागपूर जिल्ह्यातील कान्होलीबारा शेतशिवारातील प्लॉट किस्तीद्वारे विक्रीस असल्याची जाहिरात देऊन अकोल्यातील ग्राहकाची तब्बल पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्यामुळे ग्राहक मंचाने सदर ग्राहकास रेवती असोसिएट्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सने पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.नागपूर येथील लक्ष्मी नगर चौकातील रहिवासी सुहास रत्नाकर मोरे, विद्या सुहास मोरे यांची मे. रेवती असोसिएट्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी असून, या कंपनीचे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात असलेल्या कान्होलीबारा परिसरातील प्लॉट विक्रीस उपलब्ध असल्याची जाहिरात अकोल्यातील वर्तमानपत्रात दिली. आनंद गोमाजी चव्हाण रा. गायत्री नगर यांनी या दोघांची भेट घेऊन २१ डिसेंबर २०११ रोजी १ हजार ७४३ चौरस मीटर प्लॉट खरेदीचा व्यवहार केला. त्यानंतर ४ लाख ३५ हजार ९०२ रुपये बँक आॅफ इंडियाच्या शाखेतून दर महिन्याच्या किस्तीद्वारे रेवती असोसिट्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सकडे जमा केले. त्यानंतर प्लॉट खरेदी करण्यासाठी विनंती केली असता सुहास रत्नाकर मोरे, विद्या सुहास मोरे या दोघांनी त्यांची टाळाटाळ सुरू केली. चव्हाण यांनी मोरे यांची भेट घेऊन तक्रार करण्याचे म्हणताच मोरे दाम्पत्याने त्यांना त्यांचा प्लॉट २५ डिसेंबर २०१६ पूर्वी खरेदी करून देणार असल्याचे प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले व खरेदी न केल्यास एक धनादेश दिला; मात्र त्यानंतरही खरेदी करून न दिल्याने चव्हाण यांनी धनादेश बँकेत वटविण्यासाठी लावला असता तो परत आला. त्यामुळे आनंद चव्हाण यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्रात धाव घेतली. यावर मोरे दाम्पत्याने तडजोड करण्यासाठी जिल्हा ग्राहक मंचात उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन दिले; मात्र उपस्थित राहिले नाही. जिल्हा ग्राहक मंचाने सुहास रत्नाकर मोरे, विद्या सुहास मोरे यांच्या मे. रेवती असोसिएट्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सने आनंद चव्हाण यांना ४ लाख ८६ हजार ९०२ दोन रुपये १० टक्के व्याजाने परत करण्याचा आदेश दिला. यासोबतच १० हजार रुपये मानसिक त्रासापोटी देण्याचेही आदेशात नमूद आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाnagpurनागपूरCrimeगुन्हाconsumerग्राहक