शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

चलनातून बाद केलेल्या १ हजारांच्या नोटा दाखवून लाखोंची फसवणूक; लष्करातील कर्मचार्‍याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 9:02 PM

२७ लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीमध्ये चलनातून बाद केलेल्या १ हजार रुपयांच्या नोटा दाखवून त्या बदलून देतो, असे सांगून लाखो रुपयांना गंडा घालणार्‍या टोळीचा पुणे पोलिसांनी पडदा फार्श केला आहे़  लष्करातील कर्मचार्‍याला पोलिसांनी अटक केली आहे.आण्णासाहेब अर्जुन धायतिडक (वय ३६, रा. रेंजहिल्स, शासकीय निवासस्थान, खडकी, मुळ गाव ता. बार्शी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून जुन्या बंद झालेल्या १ हजार रुपयांच्या ५६ खर्‍या नोटा, भारतीय मनोरंजन बँक, व ५०० रुपयांसारख्या दिसणार्‍या बनावट नोटा, मोटार असा एकूण २७ लाख ३५ हजार ५४० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. 

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकातील सहायक पोलीस फौजदार तानाजी कांबळे यांना अण्णासाहेब धायतिडक हा जुन्या १ हजार रुपयांच्या बाद झालेल्या नोटा तसेच नकली नोटा घरी बाळगून असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप व त्यांच्या पथकाने शुक्रवारी रेंजहिल्स येथील धायतिडक याच्या घरावर छापा घालून या बाद झालेल्या व बनावट नोटा ताब्यात घेतला. 

त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यांची ही एक टोळीच असल्याचे उघडकीस आले आहे. धायतिडक हा लष्करात कामाला असून तो दीर्घ रजेवर आल्यानंतर पुन्हा ड्युटीवर पुन्हा गेला नसल्याचे समजते. त्याचा साथीदार नवाब अली हा आपण चित्रपटसृष्टी काम करत असून शुटिंगसाठी अशा नोटा वापरत असल्याचे दाखवत असे.

असा रचत असत फसवणुकीचा कटही टोळी एखादे सावज हेरत. त्याला एक केंद्र सरकारचे बनावट सक्युलेशन दाखवत. आमच्याकडे १ हजार रुपयांच्या बनावट नोटा असल्याचे सांगून ते एक व्हिडिओ दाखवत. त्यात ते वर १ हजार रुपयांची जुनी बाद झालेली नोट लावून खाली बनावट नोटाचे बंडल असे. त्यानंतर त्यांना एखादा बँकवाल्याला शोधायला सांगत. बँकर आणि २ हजार रुपयांच्या खर्‍या नोटा आणल्यास मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचे सांगत. त्यानंतर सर्व व्यवहार करुन देतो, आम्हाला त्याबदल्यात कमिशन द्यावे लागेल, असे सांगून त्यांच्याकडून कमिशनच्या नावाखाली लाखो रुपये लुटत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी पुण्यातील एकाला अशाच प्रकारे फसवून त्यांच्याकडून कमिशन पोटी तब्बल ४ लाख रुपये लुबाडले होते. सातार्‍यामध्येही त्यांनी एकाला अशाच प्रकारे लाखो रुपयांची फसवणुक केली आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने धायतिडक याला अधिक तपासासाठी खडकी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिस