शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट बुकिंगच्या नावाखाली एजंटलाच घातला ३८ लाखांचा गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 19:58 IST

विमान तिकीटाच्या नावाखाली एका एजंटने दुसऱ्या एजंटलाच ३८ लाख रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे़.

पुणे : विमान तिकीटाच्या नावाखाली एका एजंटने दुसऱ्या एजंटलाच ३८ लाख रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे़. कोंढवा पोलिसांनी नदीफ शेख (रा. अंधेरी मुंबई), हिमांशु हाथी व त्याची पत्नी (रा.अहमदाबाद, गुजरात) या तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यत आला आहे.याप्रकरणी अरबाज मुस्ताफ शेख (वय २९ ,रा. उंड्री पिसोळी) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०१७ पासून सुरु होता़. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाज शेख हे देखील कमिशनवर विमान तिकीटे बुकिंगचा व्यवसाय करतात. मात्र, त्यांच्याकडे तिकीटे बुक करण्याचा परवाना नसल्यामुळे ते मुंबईतील नदीफ तसेच अहमदाबादच्या हिमांशु या एजंटकडून तिकीटे बुक करत होते. मागील अनेक दिवसापासून ते ऐकमेकांच्या परिचयाचे असल्यामुळे आर्थिक व्यवहार त्यांच्यात सुरु होता़. शेख यांनी त्यांच्याकडे विमान प्रवासाची तिकीटे बुक केल्यानंतर प्रवासाच्या आदल्या दिवशी तिकीटे बुक झाली नसल्याचे ते सांगत असे. मात्र, त्या तिकीटांचे पैसे परत देत नसे़ त्यामुळे  शेख यांना इतर लोकांकडून जादा दराने तिकीटे बुक करत होता. असे करत-करत आरोपींनी शेख यांचे २०१७ पासून तब्बल ३८ लाख ४९ हजार ६ रुपये त्यांच्याकडे ठेवले. सुरूवातीला शेख यांना आरोपीच्या बाबती विश्वास वाटत असल्यामुळे पैसे मिळतील असे वाटत होते. पैसे मिळावे, यासाठी त्यांनी फोन, ई मेलवरुन संपर्क साधला़. मात्र, ते वेगवेगळी कारणे सांगून आज देतो, उद्या देतो असे सांगत़ अनेक दिवस वाट पाहून देखील पैसे मिळत नव्हते. त्यात यातील एका आरोपीच्या विरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल झाल्याची माहिती शेख यांना मिळाली़. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसात गुन्ह दाखल केला. 

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसticketतिकिट