तीन मोटारसायकलींसह चार चोरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 04:29 IST2019-08-16T04:29:22+5:302019-08-16T04:29:28+5:30

दुचाकी आणि मोबाइल चोरी करत उपनगरात धुमाकूळ घालणाऱ्या चार सराईत चोरांना बांगुरनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

Four thieves arrested with three motorcycles | तीन मोटारसायकलींसह चार चोरांना अटक

तीन मोटारसायकलींसह चार चोरांना अटक

मुंबई : दुचाकी आणि मोबाइल चोरी करत उपनगरात धुमाकूळ घालणाऱ्या चार सराईत चोरांना बांगुरनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या तीन दुचाकी देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
सिद्धार्थ पांडे (१९), शोएब खान उर्फ अब्बू (१९), शुभम अन्सारी (२३) आणि त्यांच्या सतरा वर्षीय साथीदाराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. हे चौघे गोरेगाव आणि जोगेश्वरी परिसरात राहणारे आहेत. रिक्षातून प्रवास करणाºया महिला प्रवाशांचा स्कुटीवरून पाठलाग करायचा आणि संधी साधत त्यांच्याकडे असलेला मोबाइल ते हिसकावून पसार व्हायचे. या तक्रारी वाढीस लागल्याने परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त मोहन दहिकर आणि बांगुरनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शोभा पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक कदम आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. यात स्थानिक खबऱ्यांचीही मदत घेण्यात आली.
तपासाअंती चौघांना अटक करण्यात बांगुरनगर पोलिसांना यश आले. त्यांच्यावर मोबाइल चोरीचे १५ तर दुचाकी चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत तीन स्कुटी पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत. या चौघांवर बांगुरनगरसह गोरेगाव, ओशिवरा, अंबोली, जोगेश्वरी आणि अंधेरी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यातील तिघांना न्यायालयाने १६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून चौथ्या अल्पवयीन आरोपीला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

Web Title: Four thieves arrested with three motorcycles