शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Prostitution : तीन अल्पवयीन मुलींसह चार वारांगणा आढळल्या; महिलेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 19:48 IST

Prostitution Case : वाठोड्यातील कुंटणखान्यावर छापा

ठळक मुद्दे त्यांच्याकडून देहविक्रय करून घेणाऱ्या अर्चना शेखर वैंशपायन नमक महिलेला पोलिसांनी अटक केली.प्राथमिक तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, प्रति ग्राहक दोन हजार रुपये घेणारी अर्चना वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलीच्या हातात पाचशे रुपये ठेवत होती. आरोपी अर्चना वैंशपायन हिला अटक करून वेश्याव्यवसाय करणाऱ्या त्या चौघींचे जबाब नोंदविण्यात आले. 

नागपूर : वाठोड्यात सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने सोमवारी सायंकाळी छापा घातला. या छाप्यात तीन अल्पवयीन मुलींसह वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार जणी सापडल्या. त्यांच्याकडून देहविक्रय करून घेणाऱ्या अर्चना शेखर वैंशपायन नमक महिलेला पोलिसांनी अटक केली.

अर्चना गेल्या अनेक महिन्यांपासून हा गोरख धंदा चालवते. प्रारंभी ती अजनीमध्ये आणि नंतर बहादुरा परिसरात भाड्याच्या सदनिकेत कुंटणखाना चालवित होती. तिच्याकडे वेश्या व्यवसाय करणाऱ्या अनेक महिला मुली आहेत. घरमालकाला संशय आल्याने त्यांनी तिला आपल्या घरातून हुसकावून लावले. दोन आठवड्यांपूर्वी तिने वाठोड्यात आठ हजार रुपये प्रतिमहिना किरायाने घर भाड्याने घेतले. तेथे ती वेश्या व्यवसाय चालवते, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांना मिळाली. त्यांनी लगेच कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवी नागोसे यांनी सोमवारी सायंकाळी सापळा रचला. अर्चना सोबत पोलिसांच्या पंटरने संपर्क साधला. दोन हजार रुपये दिल्यास अल्पवयीन मुली शरीरसंबंधासाठी उपलब्ध करून देण्याची तयारी अर्चनाने दाखवली. त्यानुसार ग्राहकाने तिला सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास रक्कम दिली. त्यानंतर अर्चनाने तीन अल्पवयीन तसेच एक तरुणी अशा चार वरांगणा ग्राहकांसमोर उभ्या केल्या. त्यातील एकीला ग्राहकाने रूम मध्ये नेले. ठरल्याप्रमाणे काही वेळातच तेथे पोलिसांनी छापा घातला. आरोपी अर्चना वैंशपायन हिला अटक करून वेश्याव्यवसाय करणाऱ्या त्या चौघींचे जबाब नोंदविण्यात आले. ७५ टक्के लाटत होती अर्चनाप्राथमिक तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, प्रति ग्राहक दोन हजार रुपये घेणारी अर्चना वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलीच्या हातात पाचशे रुपये ठेवत होती.अर्थात, ७५ टक्के रक्कम ती स्वतः लाटत होती. दरम्यान, अर्चनाविरुद्ध पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी नागोसे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मंगला हरडे, हवालदार अनिल अंबाडे, नायक संदीप चांगोले, भूषण झाडे, अजय, चेतन, प्रतिमा आदींनी ही कारवाई केली.

प्राथमिक तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, प्रति ग्राहक दोन हजार रुपये घेणारी अर्चना वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलीच्या हातात पाचशे रुपये ठेवत होती. अर्थात, ७५ टक्के रक्कम ती स्वतः लाटत होती. दरम्यान, अर्चनाविरुद्ध पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी नागोसे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मंगला हरडे, हवालदार अनिल अंबाडे, नायक संदीप चांगोले, भूषण झाडे, अजय, चेतन, प्रतिमा आदींनी ही कारवाई केली.

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायPoliceपोलिसnagpurनागपूरSex Racketसेक्स रॅकेट