शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस असल्याची बतावणी करुन चौघांनी १५ लाखांना लुबाडले; कोंढव्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 13:42 IST

लॉकडाऊनमध्ये गोदाम ठेवले उघडे : एकाला अटक

ठळक मुद्देया प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद

पुणे : लॉकडाऊनच्या काळात गोदाम सुरु ठेवल्याचे सांगून गुन्हे शाखेचे पोलीस असल्याची बतावणी करुन चौघांनी १ लाख रुपये जबरदस्तीने घेऊन गेले.याप्रकरणी कोंढवापोलिसांनी तातडीने तपास करुन त्यातील एकाला अटक केली आहे. त्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला असून चोरट्यांनी १ लाखांना नाही तर तब्बल १५ लाखांना लुबाडलेले  उघड झाले आहे.याप्रकरणी प्रकाश पेमाराम भाटी (वय ३२, रा. अजमेरा पार्क, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना धर्मावत पेट्रोल पंपाच्या मागे मासाह यांच्या एका गोदामामध्ये २२ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत घडली.याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी विनोद ऊर्फ बाळ्या लक्ष्मण गोडांबे (वय ३३, रा. पाषाण) याला अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश भाटी यांचे किराणा मालाच्या साहित्याचे गोदाम अजमरा पार्क येथे आहे.२२ जुलै रोजी सकाळी ९ वाजल्याच्या दरम्यान चौघे जण त्यांच्या गोदामात आले. त्यांनी आम्ही क्राईम बँचचे पोलीस असल्याची बतावणी केली. लॉकडाऊनच्या काळात गोदाम कसे सुरु ठेवले. गुटखा विकतो का असे म्हणून त्यांना कारवाईची भिती दाखविली़ त्यानंतर बऱ्याचवेळ ते तेथेच थांबले. त्यानंतर त्यांनी कारवाई करायची नसेल तर पैसे द्यावे लागतील असे सांगून १ लाख रुपयांची मागणी केली. भाटी यांनी १ लाख रुपये दिल्यावर ते निघून गेले.या दरम्यान त्यांनी या पोलिसांचे मोबाईलवर रेकॉर्डिंग करुन ठेवले होते. हे पोलीस नसल्याची त्यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांनी सांगितले की, भाटी यांच्यावर यापूर्वी कारवाई झाली आहे. हे हेरुन या चोरट्यांनी त्यांना लक्ष्य केले. त्यांनी वापलेल्या गाड्यांचे नंबर मिळाल्याने पोलिसांनी तातडीने विनोद गोडांबे याला अटक केली आहे. गोडांबे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गुन्हे दाखल आहे.त्याच्या साथीदारांची वर्णने मिळाली असून त्यांचा शोध सुरु आहे.दरम्यान, विनोद गोडांबे याला पकडल्यानंतर पोलिसांना याबाबत खरी हकिकत समोर आली.याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले की, भाटी याच्यावर यापूर्वी गुटखा विक्री केल्याबद्दल कारवाई झाली होती. २२ जुलै रोजी तोतया पोलिसांनी त्याच्या गोदामावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकल्याचा बनाव केला़ त्यावेळी गोदामात गुटखा आढळून आला होता.त्यामुळे त्याने या चोरट्यांना तब्बल १५ लाख रुपये दिले़ त्यानंतर त्याने गोदामातील गुटखा दुसरीकडे हलविला व दुसऱ्या दिवशी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर तपासात हा सर्व प्रकार समोर आला आहे. त्याने गुटखा कोठे ठेवला याचा शोध सुरु आहे.

टॅग्स :KondhvaकोंढवाCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटक