शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

दारू देण्यास नकार दिल्याने वाईन शॉप मालकावर प्राणघातक हल्ला; चौघे जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 21:43 IST

हल्ल्यासाठी वापरलेली ऍक्टिव्हा दुचाकीही जप्त केली आहे.

ठळक मुद्देभारतीय दंड संहितेच्या 143, 147, 148, 324, 506 (2) कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला होता. दारु देण्यास नकार दिल्याने संशयितांनी हा हल्ला केला होता.

मडगाव - वाईन शॉप मालकावर चाकू हल्ला प्रकरणी गोव्यातील फातोर्डा पोलिसांनी चार जणांच्या मुसक्या आवळल्या. रविवारी रात्री मडगाव शहरातील घोगळ येथे प्राणघातक हल्ल्याची ही घटना घडली होती. कुमार किमू चव्हाण (24), राजेश मंतास बुधियार (24), शरणू बीरु मार्टीन्स व एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. हल्ल्यासाठी वापरलेली ऍक्टिव्हा दुचाकीही जप्त केली आहे. 

अल्पवयीन मुलाला मेरशी येथील अपना घरात पाठवून दिले आहे तर अन्य कुमार चव्हाण व राजेश बुधियार या दोघांना संशयितांना अधिक तपासासाठी पाच दिवसांसाठी रिमांड देण्यात आला आहे. शरणू याला उदया गुरुवारी रिमांडसाठी न्यायालयापुढे उभे करणार आहे. या प्रकरणातील अन्य दोघेजण सध्या फरार असून त्यांचा शोध चालू आहे. रविवारी रात्री बाराच्या दरम्यान हल्ल्याची ही घटना घडली होती. या हल्ल्यात वाईन शॉप मालक फ्रेडी डायस हे जखमी झाले होते. दारु देण्यास नकार दिल्याने संशयितांनी हा हल्ला केला होता. भारतीय दंड संहितेच्या 143, 147, 148, 324, 506 (2) कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला होता. संशयितांनी तोंडावर मास्क घातले होते.रविवारी रात्री डायस हे दुकान बंद करुन घरी गेले होते. आर्ले येथे पोहचल्यानंतर त्यांना आपण मोबाईल दुकानातच विसरुन आले असल्याचे उमजून आल्यानंतर ते पुन्हा घोगळ येथील आपल्या वाईन शॉपकडे आले. नंतर शटर उघडून मोबाईल घेतल्यानतंर त्यांनी दुकान बंद करीत असताना तेथे सहाजण आले. त्यांनी दारुची ऑर्डर केली. यावेळी वेळ झाल्याचे सांगून डायस यांनी त्यास नकार दिल्यानंतर संशयितांनी त्याच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली होती. नंतर त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. यात डायस हे जखमी झाल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळाहून पळ काढला होता. पोलिसांनी काल कुमार किमू चव्हाण (24), राजेश मंतास बुधियार (24), व एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती. पोलीस तपासात शरणू याचेही नाव पुढे आल्यानंतर त्यालाही ताब्यात घेउन नंतर अटक करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकgoaगोवा