शहरात आणखीन चार घरफोड्या, चार लाखांचा ऐवज लंपास; चोरांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 21:47 IST2020-12-11T21:47:26+5:302020-12-11T21:47:32+5:30
रात्री गस्त वाढविण्याची गरज

शहरात आणखीन चार घरफोड्या, चार लाखांचा ऐवज लंपास; चोरांचा धुमाकूळ
अमरावती : शहर हद्दीत शुक्रवारी पुन्हा चार घरफोडीच्या घटना घडल्या. वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये चार लाखांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा नोंदविण्यात आला.
गाडगेनगर ठाण्यांतर्गत नवसारीनजीक संमित्र कॉलनीतील फिर्यादी सुधाकर पाडुरंग राऊत (७८) यांच्या घरी ६८ हजारांची, तर पवननगरातील एका महिलेच्या घरी १० हजारांची, नागपुरीगेट हद्दीतील हाजरानगरातील फिरोज उद्दीन शरीफ उद्दीन (२७) यांच्या घरातून ५५ हजार, अशफाक कॉलनीतील रहिवासी फिर्यादी अब्दुल वहीद अब्दुल खालीद (४५) यांच्या घरातून २ लाख ५७ हजार असा एकूण सोन्या-चांदीचे दागिने, नगदी रोख असा ३ लाख ९० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. शहरात रोज घरफोडीचे सत्र सुरू असताना पोलिसांना मात्र चोर पकडण्यात अपयश आले आहे. त्यामुळे पोलिसांची रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.