भिवंडीत चार बांगलादेशी नागरिकांची धरपकड
By नितीन पंडित | Updated: April 19, 2023 18:18 IST2023-04-19T18:17:39+5:302023-04-19T18:18:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : दि.१९- भिवंडी शहरात मोलमजुरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय नागरीक येत असतात. त्यामध्ये बांगलादेशी नागरिकांचा सुध्दा ...

भिवंडीत चार बांगलादेशी नागरिकांची धरपकड
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : दि.१९- भिवंडी शहरात मोलमजुरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय नागरीक येत असतात. त्यामध्ये बांगलादेशी नागरिकांचा सुध्दा समावेश असतो.अशाच एका कारवाईत नारपोली पोलिसांनी भारतात अनधिकृत पणे वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांची भिवंडी पोलिसांनी मंगळवारी धरपकड केली आहे.
नारपोली पोलीस ठाण्याचे पोलिस शिपाई योगेश क्षिरसागर व मयुर शिरसाट यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत तालुक्यातील दापोडा येथील पारसनाथ कंपाऊंड येथील गोदामात काम करणारे बांगलादेशी नागरीक वास्तव्य करीत असल्याची माहिती मिळाली.ही माहिती पोलिस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांना दिली असता त्यांच्यासह पोलीस निरीक्षक (गुन्हे) समाधान चव्हाण यांचे मार्गदर्शना खाली तपास पथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक रोहन एल. शेलार,सहा.पोलीस उप निरीक्षक बी एस नवले, पोलीस नाईक सहारे,पोलिस शिपाई क्षिरसागर,शिरसाठ यांनी घटनास्थळी कारवाई करीत मोहम्मद जियाउल हक उर्फ बाबु सुलतान शेख,वय २९,अबु सुफियान कबीर शेख,वय २२,अबु मोसा कबीर शेख,वय १९,मोहम्मद अफसर शेख,वय २६ अशा चार बांगलादेशी नागरिकांची धरपकड केली.
त्यांचेकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत वास्तव्याचे पुरावे आढळून आले नाहीत.ते परवाना नसताना छुप्या मार्गाने बांगलादेशा मधून भारताच्या हद्दीत घुसखोरी करून बेकायदेशीरपणे या ठिकाणी आल्याची माहिती दिली. सदर चारही नागरिकांना ताब्यात घेवून त्यांचे विरूध्द नारपोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक रोहन एल. शेलार हे करीत आहेत.