शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशातून एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या चौघांना ठाण्यात अटक, दोन कोटी २४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:49 IST

त्यांच्याकडून एक किलो ७१ ग्रॅम सहा मिलीग्रॅम वजनाच्या एमडीसह दोन कोटी २४ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठाणे: मध्यप्रदेशातून मेफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या इम्रान उर्फ बब्बू खान (३७) याच्यासह चौघांना अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हेअन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी गुरुवारी दिली. त्यांच्याकडून एक किलो ७१ ग्रॅम सहा मिलीग्रॅम वजनाच्या एमडीसह दोन कोटी २४ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अंमली पदार्थ विक्री बाबत विशेष मोहीम राबवून कडक कारवाईचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उपायुक्त जाधव, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र दौंडकर आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल मस्के यांनी विशेष मोहीम राबविली. त्याच अंतर्गत पोलीस हवालदार अमित सकपाळ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या चरईतील एमटीएनएल कार्यालयासमोर एमडी तस्करीसाठी आलेल्या इम्रान याच्यासह वकास खान (३०), ताकुद्दीन खान (३०) आणि कमलेश चौहान (२३, सर्व रा. मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून विक्रीसाठी आणलेले दोन कोटी १४ लाख ३२ हजारांचे एक किलो ७१ ग्रॅम सहा मिलीग्रॅम वजनाचे एमडी हस्तगत केले आहेत. तस्करीसाठी वापरलेल्या एका कारसह दोन कोटी २४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.या एमडीचे उत्पादन, विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाºयांमध्ये आणखी कोणा कोणाचा समावेश आहे? याचा तपास करण्यात येत असल्याचे उपायुक्त जाधव यांनी सांगितले. सर्व आरोपींना १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. चौघांपैकी इम्रान आणि कमलेश हे दोघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Four arrested in Thane for smuggling MD drugs from MP.

Web Summary : Thane police arrested four individuals smuggling MD drugs from Madhya Pradesh, seizing ₹2.24 crore worth of contraband. The accused are in police custody. Further investigation is underway to identify others involved in the drug trafficking network.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDrugsअमली पदार्थ