शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

चर्चा तर होणारच! माजी पोलीस आयुक्त संजय पांडे चौकशीसाठी कॅबने ED कार्यालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 19:55 IST

Sanjay Pandey :१ मार्चपासून मुंबई पोलीस आयुक्त म्हणून चार महिन्यांच्या कारकिर्दीपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी पोलीस महासंचालक म्हणून काम केले होते.

NSE-co Location Scam:मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मंगळवारी कथित नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) को-लोकेशन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी दिल्ली अंमलबजावणी संचालनालय (ED) कार्यालयात कॅबने पोहोचले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एजन्सीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत त्यांचा जबाब नोंदवला. १ मार्चपासून मुंबई पोलीस आयुक्त म्हणून चार महिन्यांच्या कारकिर्दीपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी पोलीस महासंचालक म्हणून काम केले होते.1986 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी पांडे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले. ईडीने समन्स बजावल्यानंतर संजय पांडे आज सकाळी 11.20 वाजता कॅबने ईडीच्या कार्यालयात पोहोचले. सकाळपासून मीडिया त्यांना या प्रकरणाशी संबंधित प्रश्न विचारण्यासाठी उभा होता. पांडे यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे अडीच तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना दुपारी दोनच्या सुमारास जेवणासाठी सुट्टी देण्यात आली. यादरम्यान ईडीने पांडे यांचा जबाब नोंदवला.

याप्रकरणी चौकशी केलीपांडे यांची ईडीची चौकशी आयसेक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीच्या कामकाजाशी संबंधित आहे. आयसेक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, इतर काही कंपन्यांपैकी एक, कथित को-लोकेशन  अनियमिततेनंतर NSE चे सुरक्षा ऑडिट केले होते. मार्च 2001 मध्ये पांडे यांनी कंपनीची स्थापना केली आणि मे 2006 मध्ये त्यांनी संचालकपद सोडले आणि त्यांच्या मुलाने आणि आईने कंपनी ताब्यात घेतली.एजन्सीने या प्रकरणी एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांचा जबाब आधीच नोंदवला आहे. रामकृष्ण तिहार तुरुंगात आहेत. एनएसई को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी रामकृष्ण  आणि समूहाचे माजी कार्यकारी अधिकारी आनंद सुब्रमण्यम यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने मार्चमध्ये अटक केली होती. ईडीने त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या आरोपांबाबत सीबीआयच्या तक्रारीची दखल घेतली होती. NSE मधील या अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करणारी आयकर विभाग ही तिसरी एजन्सी आहे.

टॅग्स :Policeपोलिसcommissionerआयुक्तMumbaiमुंबईEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय