माजी पाेलीस आयुक्त परमबीर सिंग यांना २२ जूनपर्यंत अटकेपासून दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 07:31 AM2021-06-15T07:31:14+5:302021-06-15T07:31:26+5:30

अकोल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Former police Commissioner Parambir Singh relief from custody till June 22 | माजी पाेलीस आयुक्त परमबीर सिंग यांना २२ जूनपर्यंत अटकेपासून दिलासा 

माजी पाेलीस आयुक्त परमबीर सिंग यांना २२ जूनपर्यंत अटकेपासून दिलासा 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना २२ जूनपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यात आला. या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला यापूर्वी कठोर कारवाईपासून दिलेले संरक्षण २२ जूनपर्यंत कायम ठेवत आहोत, असे राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील डी. खंबाटा यांनी न्या. पी. बी. वराळे आणि न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठाला सांगितले.
अकोल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सोमवारी त्यावर सुनावणी होती. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार केल्याने सरकार सूडबुद्धीने आपल्यावर गुन्हे दाखल करत आहे. खोट्या प्रकरणांत अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्यावरील गुन्हा रद्द करावा आणि सुनावणी प्रलंबित असेपर्यंत कठोर कारवाई करू नये, अशी मागणी सिंग यांनी याचिकेद्वारे केली.
अकोल्यात बदली केलेले पोलीस भीमराव घाडगे यांनी केलेल्या तक्रारीवरून सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंग यांची ठाण्यात बदली करण्यात आली हाेती तेव्हा ते व अन्य काही पोलिसांनी मिळून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत घाडगे यांनी अकोला येथे तक्रार केली. अकोला पोलिसांनी पुढील तपास ठाणे पोलिसांकडे वर्ग केला. ठाणे पोलीस आयुक्तालयात कामाला असताना घाडगे यांना सिंग यांनी एका प्रकरणातील काही आरोपींची नावे वगळण्याचे आदेश दिले. मात्र त्यांनी तसे न केल्याने सिंग यांनी खोटे आरोप ठेवल्याची घाडगे यांची तक्रार आहे. त्यानुसार पोलिसांनी सिंग यांच्यावर आयपीसीअंतर्गत कट रचणे, पुरावे नष्ट करणे तसेच अत्याचार प्रतिबंधक कायद्यातलीही काही कलमे लावली.

Web Title: Former police Commissioner Parambir Singh relief from custody till June 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.