शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

अनिल देशमुख यांच्या वकिलाला सीबीआयकडून अटक, ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला नेणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 11:19 IST

पुढील चौकशीसाठी वकील आनंद डागा यांना ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला नेण्यात येणार आहे.

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या सीबीआय (CBI) चौकशी प्रकरणात बुधवारी रात्री नाट्यमय घडामोडी घडल्या. यानंतर आज अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा (Anil Daga) यांना सीबीआयने अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. (Former Home Minister Anil Deshmukh Lawyer Anil Daga arrested by CBI in Mumbai)

अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु असलेला तपास पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून परिणाम करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली वकील आनंद डागा यांना अटक करण्यात आली आहे. पुढील चौकशीसाठी वकील आनंद डागा यांना ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला नेण्यात येणार आहे.

अनिल देशमुख यांच्याविरुद्धचा कथित प्राथमिक चौकशी अहवाल फोडल्याप्रकरणी सीबीआयने बुधवारी रात्री उशिरा उपनिरीक्षक अभिषेक तिवारी याला अटक केली. तर वकील आनंद डागा आणि इतर काही अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान, याच प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांनाही काल संध्याकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले आणि चौकशी करून अवघ्या २० मिनिटांत त्यांची सुटका करण्यात आली. तर अनिल देशमुख यांचे वकील ॲड. आनंद डागा यांचा मात्र रात्री उशिरापर्यत जबाब नोंदवला. त्यानंतर वकील आनंद डागा यांना सीबीआयने अटक केल्याचे समजते.

याप्रकरणी अलाहाबाद व दिल्लीत काहींचा शोध घेण्यात येत आहे. शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या या प्रकरणात बेकायदेशीर अहवाल फोडणे व त्यामध्ये फेरफार करण्यात सीबीआयमध्ये कार्यरत असलेला पीएसआय तिवारी मुख्य सूत्रधार होता. तसेच वकील व काही जणांचा यात सहभाग असल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.

देशमुख कुटुंबीयांकडून तक्रारवरळी येथील सुखदा इमारतीतील फ्लॅटमधून बाहेर पडत असताना दहा जणांच्या एका पथकाने गौरव चतुर्वेदी  यांना ताब्यात घेतले. कोणतीही नोटीस अथवा पूर्वसूचना न देता सीबीआयकडून ही कारवाई झाल्याने देशमुख कुटुंबीयांकडून चतुर्वेदी यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार वरळी पोलीस ठाण्यात देण्यात आली. मात्र वरळी पोलिसांनी अशा प्रकरणात गुन्हा दाखल करता येत नसल्याचे त्यांना समजावले. चतुर्वेदी हे पेशाने डॉक्टर असून, ते जसलोक हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतात. साई शिक्षण संस्था हवाला पैसे ट्रान्सफर व प्राथमिक चौकशी अहवाल फोडल्याप्रकरणी चौकशीसाठी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखCBIगुन्हा अन्वेषण विभाग