शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

भाजपच्या माजी नगरसेवकावर फसवणुकीचा गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 6:24 AM

Uran : राजकीय हेतूने हा गुन्हा दाखल केल्याचे भरत जाधव यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. 

उरण : उरण तालुक्यातील जांभुळपाडा येथील विकलेली जमीन पुन्हा परस्पर दुसऱ्यालाच विक्री केल्याप्रकरणी नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव आणि त्यांच्या पत्नीवर उरण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनआरआय कॉप्लेक्समध्ये राहणाऱ्या रजनी सेहगल यांना भरत जाधव आणि त्यांच्या पत्नी कविता जाधव यांनी उरण तालुक्यातील जांभूळपाडा येथील २२ गुंठे जमीन विकली आहे. जुलै २०१८ मध्ये सुमारे ३० लाख रुपयांना विकलेल्या जमिनीची किंमत सेहगल यांनी दोन टप्प्यात बँक खात्यातून अदाही केली आहे. या जागेत बांधण्यात आलेल्या घरांची घरपट्टी नावावर करून घेण्यासाठी सेहगल गेल्या असता ही जमीन जाधवांनी अन्य चार व्यक्तींना विकली असल्याचे उघडकीस आले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जाधव दाम्पत्यांच्या विरोधात उरण पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. राजकीय हेतूने हा गुन्हा दाखल केल्याचे भरत जाधव यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी