शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

TRP Scam: बार्कचा माजी सीईओ पार्थो दासगुप्ताची जामिनावर सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 05:27 IST

TRP Scam टीआरपी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दासगुप्ता असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या १५ आरोपींपैकी पार्थो हाच एकटा सध्या कारागृहात आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेला बार्कचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने मंगळवारी मंजूर केला. त्याच्या कोठडीची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्या. पी. डी. नाईक यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने पार्थो दासगुप्ता (वय ५५) याला दोन लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका व तेवढीच रक्कम भरणारे दोन हमीदार सादर करण्याचे निर्देश दिले. टीआरपी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दासगुप्ता असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या १५ आरोपींपैकी पार्थो हाच एकटा सध्या कारागृहात आहे. 

न्यायालयात सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार व परिस्थितीनुसार, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे आरोपीला कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही, असे न्या. नाईक यांनी जामीन मंजूर करताना म्हटले.  दासगुप्ताची जामिनावर सुटका करण्यात आली, तर तो तपासाला हानी पोहोचवणार नाही. त्यामुळे खटला संपेपर्यंत आरोपीला कारागृहात ठेवण्याची गरज नाही. त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात येत आहे. दोन लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका भरावा. तेवढीच रक्कम भरणारे दोन हमीदार सादर करावेत, असा आदेश न्यायालयाने दिला. 

दासगुप्ताला पासपोर्ट संबंधित पोलीस ठाण्यात जमा करायला सांगितला. ट्रायल कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडून न जाण्याचे आदेशही दिले. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी सहा महिने पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश दिले. ट्रायल कोर्ट जेव्हा आदेश देईल तेव्हा न्यायालयात हजर राहण्याचे निर्देशही न्यायालयाने दासगुप्ताला दिले.

टॅग्स :TRP Scamटीआरपी घोटाळा