शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग केल्याप्रकरणी परदेशी नागरिकाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 17:48 IST

डॅमेना गेटराचेव्ह अकाने (५१) असं या आरोपीचं नाव आहे.

ठळक मुद्दे २१ वर्षीय पीडित तरुणी तिच्या नातेवाईकांसोबत जेवण्यासाठी आली होती. दारूच्या नशेत हा प्रकार घडला असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. पीडित तरुणी हात धुण्यासाठी बेसिंगजवळ जात असताना डॅमेना याने तिचा हात पकडत, तिला पैसे देण्याचा प्रयत्न केला.

मुंबई - कुलाबा पोलिसांनी कुलाबाच्या तुलस रोडवरील एका रेस्टॅरंटमध्ये तरुणीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या ५१ वर्षीय इथोपियन नागरिकाला पोलिसांनीअटक केली आहे. डॅमेना गेटराचेव्ह अकाने (५१) असं या आरोपीचं नाव आहे. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  

मूळ इथोपियाचा नागरिक असलेला डॅमेना हा शनिवारी पहाटे कुलाबाच्या रेस्टॅरंटमध्ये त्याच्या मित्रासोबत गेला होता. त्यावेळी २१ वर्षीय पीडित तरुणी तिच्या नातेवाईकांसोबत जेवण्यासाठी आली होती. पीडित तरुणी हात धुण्यासाठी बेसिंगजवळ जात असताना डॅमेना याने तिचा हात पकडत, तिला पैसे देण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने संतापलेल्या तरुणीने डॅमेनाच्या कानाखाली लगावली. या प्रकारानंतर  रेस्टॅरंटमधील कर्मचारी आणि तरुणीच्या कुटुंबीयांनी डॅमेनाला चोप देत पोलिसांना बोलावले. घटनास्थळी कुलाबा पोलीस आल्यानंतर डॅमेनाला त्यांच्या ताब्यात देण्यात आलं. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी डॅमेनावर गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. दारूच्या नशेत हा प्रकार घडला असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसMolestationविनयभंग