शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीत एकाच दिवशी पाच वाहने लंपास  :  सायकलचीही चोरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:54 IST

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये एकाच दिवसात वेगवेगळ्या प्रकारची पाच वाहन चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देवाहनचोर शोधण्याचे पोलिसांपुढे आवाहन

पिंपरी : मागील काही दिवसांमध्ये शहरामध्ये अनेक दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. असे असताना आता चोरटे दुचाकी, कार यासारख्या वाहनांबरोबरच मालवाहतूक करणारे पिकअप आणि महागड्या सायकलही चोरून नेत असल्याने पोलिसांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये एकाच दिवसात वेगवेगळ्या प्रकारची पाच वाहन चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. चोरीच्या घटना वाढलेल्या असतानाही या चोरट्यांचा तपास करण्यात पोलिसांना अपयश येत आहे.  रविवार (दि. २१) रोजी शहरात विविध ठिकाणी चोरीला गेलेल्या वाहनाचे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये लहानू हरिभाऊ आग्रे यांनी त्यांची दुचाकी भोसरी एमआयडीसी परिसरातील गणराज हॉटेल समोरील किराणा दुकानासमोर लावलेली होती. ते किराणा साहित्य घेत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच १४/एवाय/८९११) बनावट चावीच्या साहाय्याने चालू करून चोरून नेली. तर चिंचवड येथील घटनेमध्ये चोरट्यांनी इंडिका व्हिस्टा हे चारचाकी वाहन चोरून नेले. रियाज शौकत शेख (वय ६६) यांनी त्यांची इंडिका गाडी दि. ११ जुलै रोजी त्यांच्या घरासमोर लावली असता अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीच्या साहाय्याने चालू करून पळवून नेली. हिंजवडी येथे अनिल रामगोपाल गुप्ता (वय ६०, रा. मारुंजी) यांनी त्यांची ७० हजार रुपयाची दुचाकी (क्र. एमएच १२/पीके/२५९२) ही दि. २० जुलै रोजी रात्री लॉक करून पार्क केली असता अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस