शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

टोळक्याने केलेल्या हल्ल्यात पाच जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 00:56 IST

पवनानगर येथील ठाकूरसाई गावात किरकोळ कारणावरून टोळक्याने एका घरावर केलेल्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत, तर दगडफेक केल्याने घराचे पत्रेदेखील फुटल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोणावळा - पवनानगर येथील ठाकूरसाई गावात किरकोळ कारणावरून टोळक्याने एका घरावर केलेल्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत, तर दगडफेक केल्याने घराचे पत्रेदेखील फुटल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडला.पवनानगर येथील पत्रकार रवी ठाकर हे रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या भावाच्या आल्टो गाडीतून मुलांसह शेतावरील घरी जात असताना गेव्हंडे गावाकडील अरुंद रस्त्यावर समोरून एक मोटार आली. दोन्ही गाड्या एकाच वेळी जाणे शक्य नसल्याने व ठाकर यांच्या गाडीच्या मागे तीन-चार गाड्या असल्याने त्यांच्या भावाने समोरील चालकाला गाडी मागे घेण्याची विनंती केली. मात्र गाडी मागे घेण्याऐवजी त्या गाडीतून दोघे जण खाली उतरले व त्यांनी ठाकर यांना शिवीगाळ केली.रात्री दहाच्या सुमारास हेच युवक अन्य बारा-तेरा जणांच्या टोळीसह हातात लाकडी दांडके, दगड घेऊन ठाकर यांच्या घरावर चालून आले. घराच्या बाहेर उभे राहून शिवीगाळ करू लागले. या वेळी घराबाहेर आलेले रवी ठाकर यांचे वडील नामदेव ठाकर, भाऊ दिनेश ठाकर, चुलत भाऊ विशाल ठाकर, अशोक ठाकर, राजू ठाकर यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यामध्ये नामदेव ठाकर यांच्या डोक्याला, तर इतरांच्या डोक्याला व पाठीला मार लागला आहे. भाडण सोडविण्यासाठी गेलेल्या रवी ठाकर यांनादेखील मारहाण केली.याप्रकरणी शिवली येथील नीलेश येवले व राऊतवाडी येथील अक्षय राऊत यांच्यासह बारा ते तेरा जणांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत याला अटक झाली असून, चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गा जाधव तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे