शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! लॉकडाऊनमध्ये एकाचवेळी घरात मिळाले ५ जणांचे मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 13:22 IST

शनिवारी सकाळी एटा येथे राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचे घरात मृतदेह आढळले आहेत.

ठळक मुद्दे पोलिसांनी घटनास्थळावर पोहचून घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता अवस्था अत्यंत हृदयद्रावक होती. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास एटाच्या मोहल्ला श्रृंगार नगरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

आग्रा - लॉकडाऊनमध्ये एकाचवेळी घरात पाच जणांचे मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी एटा येथे राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचे घरात मृतदेह आढळले आहेत.पोलिसांनी घटनास्थळावर पोहचून घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता अवस्था अत्यंत हृदयद्रावक होती. सर्वांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मृतांमध्ये मुलेही आहेत. सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे, हत्या किंवा सामूहिक आत्महत्येचे प्रकरण आहे का हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या घटनेने खळबळ उडाली आहे.

Coronavirus Lockdown : नमाज-ए-जुम्मा अदा करण्यासाठी मशिदीत जमलेल्यांनी पोलिसांवर केली दगडफेक

लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडलेल्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

नर्सरीत चिमुकल्यांसोबत घडला क्रूर प्रकार, अल्पवयीन मुलाने केले लैंगिक शोषण

शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास एटाच्या मोहल्ला श्रृंगार नगरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. रात्री उशिरापर्यंत शेजार्‍यांना कोणी घराबाहेर पडताना दिसले नाही तेव्हा त्यांना संशयास्पद वाटले. कुणीतरी पोलिसांना माहिती दिली. पोलीस दरवाजा तोडून आत शिरले. राजेश्वर प्रसाद पचौरी (75), जावई दिव्या (35), नातू आयुष (८) आणि लालू (१) आणि दिव्याची बहीण बुलबुल (२०) यांचे मृतदेह घरात वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते. वयस्कर राजेश्वर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, तर दिव्याच्या हाताची नस कापलेली होती. जागेवर ब्लेडचा तुकडा आणि सल्फासच्या गोळ्याही सापडल्या आहेत. घर बंद होते आणि पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. रात्री कोणत्या वेळी ही घटना घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राजेश्वरचा मुलगा दिलीप रुड़की येथे काम करतो, तो घरी नव्हता. घरात फक्त मुले व स्त्रिया होती. माहिती मिळताच एसएसपी सुनील कुमार सिंह आणि इतर अनेक पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला.डोक्याला इजा झाल्याने खुनाचा संशय हत्येला आत्महत्या केल्याचे रंग तर देण्यात आला असल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे, परंतु वयस्कर महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, त्यामुळे या हत्या असल्याचा संशय पोलीस व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की, जर ही घटना आत्महत्येची असेल तर डोक्याला इजा कशी होईल. वयोवृद्धाच्या दुखापतीमुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे, त्यामुळे पोलिसांना याक्षणी कोणतेही ठोस निकाल लावता आला नाही. मात्र, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली असून त्यांनी बोटांचे ठसे व चाचणीचे नमुने घेतले आहेत. पोलीस सध्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसSuicideआत्महत्याFamilyपरिवार