शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल सामन्यावर बेटिंग घेणाऱ्यांना पाच जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 03:38 IST

Crime News : लोट्सबुक२४७ या वेबसाइटचा वापर करून बेटिंग घेत होते. त्यांच्याकडून १३ मोबाइल फोन, लॅपटॉप, टीव्ही रायटर व १ लाख ३४ हजारांची रोकड जप्त केली.

मुंबई : आबुधाबी येथे सुरू असलेल्या आयपीएलमधील क्रिकेट सामन्यावर सट्टा घेत असलेल्या घाटकोपर पूर्व येथील एका हुक्का पार्लरवर मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकला. बुकीसह पाच जणांना अटक केली. लोट्सबुक२४७ या वेबसाइटचा वापर करून बेटिंग घेत होते. त्यांच्याकडून १३ मोबाइल फोन, लॅपटॉप, टीव्ही रायटर व १ लाख ३४ हजारांची रोकड जप्त केली.   घाटकोपर पूर्व येथील किक कॅफे या हुक्का पार्लर येथे आबुधाबी येथे शुक्रवारी रात्री सुरू असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब व राजस्थान रॉयल या संघातील सामन्यावर बेटिंग घेण्यात येत असल्याची माहिती गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष ५ चे प्रभारी जगदीश साईल यांना मिळाली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्यांनी निरीक्षक योगेश चव्हाण, सहायक निरीक्षक  गणेश  जाधव, महेंद्र पाटील आदींच्या पथकासह त्या ठिकाणी छापा टाकला.तेथे मोबाइलवर ‘लगाई खाई’ या ॲपवर बेटिंग घेण्यात येत होते, त्यासाठी वापरलेले मोबाइलचे सिम कार्ड हे बनावट कागदपत्रे सादर करून मिळविले असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. अटक केलेले पाचही जण पोलीस कोठडीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी