शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

पहिल्यांदा महिला IPSच्या खांद्यावर नक्षल ऑपरेशनची कमान, रवीना टंडन म्हणाली.... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 17:07 IST

IPS Ankita Sharma : एका सोशल मीडिया यूजरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'बस्तरमध्ये पहिल्यांदाच नक्षल ऑपरेशनची कमान महिला आयपीएसच्या हाती आहे.' खुद्द आयपीएस अंकिता शर्मानेही रवीना टंडनच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, "खूप खूप धन्यवाद"

रायपूर - छत्तीसगडच्या भूपेश बघेल सरकारने रायपूरच्या शहर एसपी असलेल्या IPS अधिकारी अंकिता शर्मा यांची नक्षलग्रस्त बस्तर जिल्ह्याचे ASP पदी नियुक्ती केली आहे. छत्तीसगडच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी अंकिता शर्मा यांनी नक्षल ऑपरेशनची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तिची खूप चर्चा झाली. सोशल मीडियावर लोकांनी त्यांना स्टार म्हणूनही गौरविले. बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडननेही तिचे खूप कौतुक केले आहे. एवढेच नाही तर रवीना टंडनने तिला खरी हिरोईन म्हटले आहे.एका सोशल मीडिया यूजरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'बस्तरमध्ये पहिल्यांदाच नक्षल ऑपरेशनची कमान महिला आयपीएसच्या हाती आहे.' खुद्द आयपीएस अंकिता शर्मानेही रवीना टंडनच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, "खूप खूप धन्यवाद"

जाणून घ्या! कोण आहेत IPS अधिकारी अंकिता शर्मा?अंकिता शर्मा २०१८ बॅचच्या आयपीएस बॅचची अधिकारी आहेत . त्यांचा जन्म छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात झाला. अंकिता शर्मा यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग सुरू करून प्रसिद्धीच्या झोतात आली. अंकिता शर्मा यांना छत्तीसगडची पहिली महिला आयपीएस अधिकारी होण्याचा मानही मिळाला आहे. २०१८ च्या UPSC परीक्षेत अंकिता शर्माने 203 रँक मिळवले, तर तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश लाभले. अंकिताला नक्षलग्रस्त बस्तर जिल्ह्याची एएसपी बनवण्यात आली आहे. सरकारने त्यांच्यावर ऑपरेशन बस्तरची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

अंकिता शर्माने छत्तीसगडच्या प्रशासकीय विभागात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना एक दबंग आणि जिगरबाज पोलीस अधिकारी मानले जाते. अतिशय सक्रिय अधिकारी म्हणून अंकिता शर्मा यांची ओळख आहे. त्यांना घोडेस्वारी आणि बॅडमिंटनचीही आवड आहे. त्या अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. अंकिता यांनी यावर्षी प्रजासत्ताक दिनी रायपूरमध्ये परेडचे नेतृत्व केले. IPS अंकिता शर्मा छत्तीसगडच्या इतिहासात प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे नेतृत्व करणारी पहिली महिला पोलीस अधिकारी ठरली आहे.

 

 

टॅग्स :Raveena Tandonरवीना टंडनPoliceपोलिसChhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादी