शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतरही विसरले नाहीत पहिलं प्रेम, भिवंडीत युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 20:07 IST

सागर संतोष वाघे (वय - २६) आणि अंकिता मंगेश दिवे (वय २३) अशी मयत प्रेमीयुगुलाची नावे आहेत; दोघांचेही लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते.

ठाणे - लग्नानंतरही पाहिलं प्रेम तसंच होतं आणि त्या प्रेमीयुगुलाचे गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह झाडावर आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील लापबुद्रुक गावानजीक घडली आहे. सागर संतोष वाघे (वय - २६) आणि अंकिता मंगेश दिवे (वय २३) अशी मयत प्रेमीयुगुलाची नावे आहेत. दोघांचेही लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते.

अंकिता विवाहित असून गेल्या तीन वर्षापासून ती माहेरी राहत होती. तसेच सागरला १ वर्षाचा मुलगा आहे. तर अंकितालाही २ वर्षाचा मुलगा आहे. भिवंडी तालुक्यातील लापबुद्रुक गावच्या हद्दीतील सुकाळापाडा येथे तानसा पाईपलाईनलगतच्या झाडाला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दोघांचेही मृतदेह आढळले. आज सकाळी गावकऱ्यांनी हे भयानक दृश्य पाहिले. त्यानंतर या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील व्यंकोजी जाधव यांनी पडघा पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच पडघा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी तालुक्यातील पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत.

या प्रेमीयुगुलाच्या आत्महत्या का केली हे उघड झाले नाही. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांनी आत्महत्या केली की, त्यांची हत्या करून त्यांना झाडाला लटकवले, याचा उलगडा होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पडघा पोलिसांनी प्राथमिक अपमृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणेSuicideआत्महत्याbhiwandiभिवंडीPoliceपोलिस