शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

Nashik Bus Fire: खिडकीतून बायकोला आधी खाली फेकले, मग मी उडी मारली; नाशिक बस आगीतून बचावलेल्याची आखोंदेखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 05:42 IST

...पेटलेले प्रवासी पळत होते; भीषण अपघाताने समाजमन सुन्न, आग विझवण्यासाठी काहीच साधन नव्हते

 - संदीप झिरवाळलोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केवळ एक मोठा आवाज... त्यानंतर किंकाळ्यांनी संपूर्ण बस हादरली... प्रारंभी, केवळ पुढील बाजूने पेटलेल्या बसने क्षणार्धात मागील बाजूनेही पेट घेतला...खिडकीतून उडी मारत अनेकांनी जीव वाचवला... आतमध्ये अडकून पडलेल्यांच्या किंकाळ्या... असे प्रारंभीच्या दहा मिनिटांतील दृश्य केवळ अंगाचा थरकाप उडविणारे होते. अशी भावना अपघातातून कसाबसा जीव वाचवत जखमी झालेल्या प्रवाशांनी व्यक्त केली. 

अपघातानंतर बसमधील प्रवासी बाहेर येण्यासाठी जिवाच्या आकांताने आक्रोश करीत होते, तर काही प्रवासी खिडकीची काच फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते. काही प्रवासी पेटलेल्या अवस्थेत बाहेर पडले, तर काही रस्त्यावरच जळालेल्या अवस्थेत तडफडत होते...आग विझविण्यासाठी जवळपास काहीच साधन नसल्याने हतबल होत पाहण्यापलीकडे काहीच करता आले नाही, ज्यांना जमेल तसे त्यांनी जीव वाचविले.

डोळ्यांदेखत मृत्युतांडवसकाळी ५ वाजून १० मिनिटांनी अपघाताचा मोठा आवाज झाला आणि मी व माझा मुलगा आम्ही आवाजाच्या दिशेने धावलो. तोवर आरामबसला मोठी आग लागल्याचे दिसले. काही प्रवासी खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यातील काही लोकांना आम्ही हात देऊन बाहेर काढले. प्रवासी डोळ्यांदेखत जळत होते, असे प्रत्यक्षदर्शी रामराव सूर्यवंशी यांनी सांगितले. 

अधिकाऱ्याचीच भागीदारीयवतमाळात प्रतिनियुक्तीवर आलेल्या वाहन निरीक्षकांच्याच दोन ट्रॅव्हल्स आहेत. हा वाहन निरीक्षक पूर्णवेळ ट्रॅव्हल्स पॉइंटवर बसतो. या अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काही महिन्यांपूर्वी जाबही विचारला  होता. मात्र,  खात्यातील वरिष्ठांची मेहरबानी असल्याने हा अधिकारी येथेच ठाण मांडून आहे.  

मी दिग्रसवरून बसल्यापासून वरच्या बर्थवर झोपून होतो. आमच्या बसची धडक बसल्याने मी थेट वरून खाली कोसळलो. त्यामुळे मला जागेवरून उठतादेखील येईना; पण जीव वाचविण्यासाठी बसच्या मधल्या भागातून काचा फोडून कशीबशी बाहेर उडी मारली. माझी बॅग, मोबाईल सगळे जळाले.- हंसराज बागूल, रा. कसारा (कनिष्ठ अभियंता, पाटबंधारे विभाग)

ट्रॅव्हल्स एजंटला प्रवाशांची माहिती नाहीमाझ्याकडून बुकिंग झालेले नसल्यामुळे बिबी येथून चिंतामणी ट्रॅव्हल्समध्ये काेणते प्रवासी हाेते, याची माहिती बीबी येथील ट्रॅव्हल्स एजंट बापू देशमुख यांना नसल्याची माहिती समाेर आली. रात्री जोरदार पाऊस असल्याने नेमके बसद्वारे कोण गेले, हे सांगता येत नसल्याचे ते म्हणाले. 

खिडकीतून बायकोला फेकून घेतली उडी!यवतमाळ : सगळीकडे आगच आग...प्रत्येकजण आकांत करीत होता...समोर साक्षात यमराज दिसत होता... काही सुचत नव्हते...ट्रॅव्हल्सची खिडकी फोडली...आधी बायकोला बाहेर फेकले, मग मीही उडी मारली म्हणून वाचलो... अपघातातून कसाबसा बचावलेला सचिन थरारक अनुभव ‘लोकमत’ला सांगितला. महागाव तालुक्यातील पिंपळगाव सूतगिरणी येथील हा तरुण चर्चगेट परिसरातील कन्स्ट्रक्शन कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतो. 

उडी मारल्याने बचावला मुंबईला नोकरी मिळाल्याने रुजू होण्यासाठी निघालेला विशाल पतंगे सकाळी साखर झोपेत असताना, अपघातानंतर झालेल्या मोठ्या आवाजाने जागा झाला. त्यामुळे त्याने घाबरतच परिस्थितीचा अंदाज घेत, बसच्या खिडकीतून बाहेर उडी मारत स्वत:चा जीव वाचविला. नाशिकच्या सिल्व्हर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

बसच्या बाहेर उचलून फेकल्याने वाचलाेnअकोला : काेणीतरी आम्हाला उचलून बाहेर फेकले. त्यामुळे प्राण वाचले, असे जखमी मावशीने सांगितले, अशी माहिती शे. खलील शे. इस्माईल यांनी  दिली.nजे. जे. रुग्णालयात उपचारासाठी भरती असलेल्या बहिणीला बघायला माझे वडील इस्माईल व मावशी जैतूनबी मुंबईला अपघातग्रस्त बसमधून निघाले हाेते. अपघातात वडिलांच्या दाेन्ही पायांना फ्रॅक्चर झाले आहे. 

लाेणार तालुक्यातील आजी, नातीचा मृत्यूदत्ता उमाळे । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/ मेहकर : नाशिक येथे झालेल्या भीषण अपघातात बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बिबी येथील आजी व नातीचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मीबाई नागुराव मुधोळकर (वय ५०) आणि कल्याणी आकाश मुधोळकर (३) अशी मृतांची नावे आहेत. लोणार तालुक्यातील बिबी येथून ७ ऑक्टोबरला रात्री त्या बसमधून लक्ष्मीबाई नागुराव मुधोळकर, कल्याणी आकाश मुधाेळकर, मुलीची मुलगी पायल शिंदे (७) आणि कल्याणीचा पाच वर्षीय भाऊ चेतन मुधोळकर  हे चौघे जण प्रवास करत होते.  यातील चेतन आणि पायल हे या अपघातात जखमी असून, त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत.

आरटीओला जाग, ट्रॅव्हल्सची तपासणी यवतमाळ : जिल्ह्यातून पुणे, मुंबई, हैदराबाद या महानगरात जाण्यासाठी एसटी बसशिवाय खासगी ट्रॅव्हल्स हाच एकमेव पर्याय आहे. ट्रॅव्हल्सच्या एकूणच सुरक्षेकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. मात्र अपघातानंतर वाहन निरीक्षकांचे पथक ट्रॅव्हल्स पॉइंटची तपासणी करीत होते. 

टॅग्स :Accidentअपघात