शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आधी दिला करंट, त्यानंतर कुऱ्हाडीने मानेवर वार करुन पत्नीला ठार मारले; चंद्रपूरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 10:20 IST

गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील योगिता बावणे, राजू बावणे या पती-पत्नीत वाद झाला.

गोंडपिपरी / वढोली (चंद्रपूर) : पती-पत्नीत झालेल्या वादाचे रुपांतर क्रूर घटनेत झाले.  तिला विद्युत करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसल्यानतर तिच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून तिला ठार मारले. त्यानंतर स्वत: विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या भंगाराम तळोधी येथे घडली. योगिता राजू बावणे (३५, रा. भंगाराम तळोधी) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पती राजू बावणे (४२, रा. भंगाराम तळोधी) याच्यावर ग्रामीण रुग्णालयात पोलीस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत.

गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील योगिता बावणे, राजू बावणे या पती-पत्नीत वाद झाला. त्यानंतर रात्री दीड वाजताच्या सुमारास राजू बावणे याने विद्युत करंट देऊन पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्युत करंट देऊनही ती जिवंत असल्याचे पाहून राजूने अतिशय निष्ठूरतेने पत्नी योगिताच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून तिला पलंगावरच ठार केले. घटनेनंतर घाबरलेल्या पतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने राजू बावणे यास उपचारासाठी गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस