शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 1:36 AM

बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात हेल्मेटधारी हल्लेखोरांनी महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर बेछुट गोळीबार केला. सुदैवाने गोळ्या गाडीवर लागल्याने दैव बलवत्तर म्हणून जोशी या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले.

ठळक मुद्देहेल्मेटधारी हल्लेखोरांनी चार गोळया झाडल्या : गाडीवर लागल्याने जोशी थोडक्यात बचावले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात हेल्मेटधारी हल्लेखोरांनी महापौरसंदीप जोशी यांच्या वाहनावर बेछुट गोळीबार केला. सुदैवाने गोळ्या गाडीवर लागल्याने दैव बलवत्तर म्हणून जोशी या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले.

हल्लेखोरांनी एकामागे एक चार गोळ््या झाडल्या आणि क्षणात पसार झाले. ही घटना अमरावती आऊटर रिंग रोडवर मंगळवारी मध्यरात्री १२ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.महापौरसंदीप जोशी वर्धा मार्गावरील जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनजीकच्या रसरंजन धाब्यावरील स्वत:च्या लग्नाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून १२ च्या सुमारास कुटुंबिय व आपल्या मित्रासह नागपूर शहराकडे परत येत होते.

धाब्यावरून ७ गाड्या नागपूरच्या दिशेने निघाल्या. त्यांचे कुटुंबीय व मित्रमंडळीच्या गाड्या पुढे होत्या. तर सर्वात मागे जोशी यांची गाडी होती. संदीप जोशी स्वत:ची फॉर्च्युनर गाडी चालवित होते. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनजीकच त्यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछुट गोळीवार केला.

हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या. एका सेकंदाचाही फरक पडला असता तर गोळी त्यांच्या डोक्यात किंवा छातीला भेदून गेली असतील. दरम्यान, ते भांबावले पण प्रसंगावधान दाखवत आणि मोठ्या धैर्याने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. या घटनेसंदर्भात संदर्भात जोशी यांनी लगेच शहर पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांना माहिती दिली. तसेच बेलतरोडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच आ. विकास ठाकरे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपायुक्त विनीता साहू, पोलीस उपायुक्त निर्मलादेवी, पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जोशी यांचे मित्रमंडळीही घटनास्थळी उपस्थित होते. 

६ डिसेंबरला मिळाली होती धमकीसंदीप जोशी यांनी शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी शहरातील प्रमुख मार्ग व बाजार भागातील अतिक्रमण काढण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्या दिशेने कारवाईलाही सुरुवात केली होती. यासोबतच नागरिकांच्या समस्या व तक्रारी जाणून घेण्यासाठी शहरात विविध ठिकाणी १०० तक्रार बॉक्स लावले होते. यात जोशी यांना एक निनावी धमकी पत्र आले होते. यात त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यासंदर्भात त्यांनी ६ डिसेंबरला सदर पोलिसात तक्रारही दाखल केली होती.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीnagpurनागपूरMayorमहापौर