शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

हॉटेलचा पत्ता न सांगितल्याने छऱ्याच्या बंदुकीतून युवकावर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 13:08 IST

अहमदनगर येथून आलेल्या तिघांनी प्यासा हॉटेलचा पत्ता अगोदर का सांगितला नाही म्हणून एका युवकावर छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार केला.

ठळक मुद्देएकाला अटक : सीसीटीव्हीमुळे उघडकीस आला खरा प्रकार

पुणे : अहमदनगर येथून आलेल्या तिघांनी प्यासा हॉटेलचा पत्ता अगोदर का सांगितला नाही म्हणून एका युवकावर छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार केला. अगोदर पत्ता माहित नाही, असे का सांगितलेस म्हणून दारु पिल्यानंतर त्याला मरीआई गेटजवळ सोडताना त्याच्यावर छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार करुन जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे़. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी अंबादास अशोक होंडे (वय २८, रा़ सध्या दापोडी, मुळ-अहमदनगर) याला अटक केली असून त्याच्या दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे़. हा प्रकार शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान घडला़.याप्रकरणी सनी चौधरी (वय १७, रा़ अपर इंदिरानगर, बिबवेवाडी) याने फिर्याद दिली आहे़. छऱ्याच्या बंदुकीतील गोळी चौधरीच्या उजव्या पायाच्या पोटरीला व डाव्या पायाच्या मांडीला लागून जबर दुखापत झाली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सनी चौधरी हा सुब्बाननल्लाह हॉटेलमध्ये जेवण करुन घरी जात होता़. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या कारमधून तिघे जण आले़. त्यांनी सनीला प्यारा हॉटेल कोठे आहे, असे विचारले़ त्याने सुरुवातीला मला माहिती नाही, असे सांगितले़ त्यांनी दमबाजी केल्यानंतर त्याने प्यासा हॉटेल दाखविले़. अगोदर का सांगितले नाही, याचा राग येऊन त्यांनी सनीला मारहाण करुन शिवीगाळ केली़ मारहाण करुन होंडे याने त्याच्याकडील छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार केला़ त्यात तो जखमी झाला़. याबाबतची माहिती मिळाल्यावर फरासखाना पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली़ सुरुवातीला त्याने व्यवस्थित उत्तरे दिली नाहीत़. पोलिसांनी सिटी पोस्ट, प्यारा हॉटेल समोरील सीसीटीव्ही फुटेज तपासले़. तेव्हा सिटी पोस्ट येथे तो रात्री १२ वाजता गाडीत बसताना दिसत होता़ तर प्यारा हॉटेलबाहेर पहाटे साडेतीन वाजता सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होता़. त्यानंतर त्याने खरी हकीकत सांगितली़. त्यानुसार आरोपींना त्याने नंतर हॉटेल दाखविले़. आरोपींनी पैसे दिल्यावर तो प्यासा हॉटेलमधून दारु घेऊन आला़. त्यांनी गाडीतच बसून दारु पिली़. त्यानंतर त्यांनी तुला डेक्कनला सोडतो असे सांगितले व गाडी घेऊन ते निघाले़. गाडीत त्यांनी सनीला तू अगोदर प्यासा का दाखविले नाही, यावरुन त्याला शिवीगाळ करुन मारहाण केली़. तेव्हा तो घाबरुन ओरडू लागला़ तेव्हा त्यांनी मरीआई गेटजवळ त्याला गाडीतून उतरताना गोळीबार करुन जखमी केले़. त्यानंतर तो अपर इंदिरानगर येथील घरी गेला व नंतर तो बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गेला़. पोलिसांनी त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात नेले़ तेथे हा प्रकार शिवाजी रोडवर घडल्याने फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला़. पोलीस उपनिरीक्षक यश सूर्यवंशी यांनी याप्रकरणी तपास करुन एकाला अटक केली आहे़. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस