वडगाव मावळ : आंदर मावळातील वहाणगाव येथील एका फार्महाऊसवरील मॅनेजरवर अज्ञात दोन व्यक्तींनी गोळीबार केला. ही घटना बुधवारी सकाळी घडली. या मध्ये एक जण जखमी झाला आहे.मिलींद मधुकर मणेरीकर असे जखमी झालेल्याचे नाव आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार मणेरीकर व त्यांचा मित्र चेतन निमकर हे मोटारीतून तळेगावकडून वहान गावकडे चालले होते त्यावेळी पाठीमागून मोटरसायकल वरून आलेला दोघांनी हांडे पोल्ट्री फार्मचा पत्ता विचारला त्यावेळी मणेरीकर यांनी मोटारीची काच खाली घेतली त्यावेळी दुचाकीवरील युवकाने त्यांच्यावर गावठी कट्टाने गोळ्या झाडल्या त्यात मणेरीकर जखमी झाले त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आरोपीला शोधण्यासाठी नाकाबंदी केली आहे
मावळ हादरलं! फार्महाऊस मॅनेजरवर दोन व्यक्तींचा अंदाधुंद गोळीबार, एकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 15:48 IST