उल्हासनगरातील रहिवासी क्षेत्रात फटाक्याचे गोदाम, ३ लाखांचे फटाके जप्त, गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: October 7, 2025 19:35 IST2025-10-07T19:35:16+5:302025-10-07T19:35:30+5:30
क्षमतेपेक्षा जास्त फटाक्याचा साठा, ३० दुकानाला परवानगी थाटली ६० दुकाने

उल्हासनगरातील रहिवासी क्षेत्रात फटाक्याचे गोदाम, ३ लाखांचे फटाके जप्त, गुन्हा दाखल
सदानंद नाईक, उल्हासनगर: विनापरवाना व कोणत्याही सुरक्षेविना रहिवासी भागात फटाक्याचा साठा ठेवल्याचा प्रकार सोमवारी दुपारी उघड झाला. उल्हासनगर पोलिसांनी फाटक्याच्या गोदामावर कारवाई करून ३ लाख ३१ हजाराचे फटाके जप्त करून उमेश वधारिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-२, मोनिका हॉल, लँडमार्क शेजारील रहिवासी क्षेत्रात विनापरवाना व कोणत्याघी सुरक्षाविना एका गोदामात फटाक्याचा साठा ठेवल्याची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्याने उल्हासनगर पोलीस ठाण्यात केली. या फटक्याच्या साठ्याने रहिवासी क्षेत्रातील नागरिकांच्या जिवेला धोका निर्माण झाल्याचे त्याचे म्हणणे आहे. उल्हासनगर पोलिसांनी सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान लँडमार्क मोनिका हॉल शेजारील फटाक्याच्या गोदामवर धाड टाकून १ लाख ३१ हजार शंभर रुपयाचे फटाके जप्त केले. याप्रकरणी उमेश वधारिया या फाटक्याच्या व्यापाऱ्यावर विनापरवाना व कोणत्याही सुरक्षाविना फटाक्याच्या साठा करून ठेवल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर नेहरू चौक परिसरात फटक्याची मोठी बाजारपेठ असून जिल्हातील व्यापारी व नागरिक फटाके खरेदी करण्यासाठी याठिकाणी येतात. महापालिका अग्निशमन विभाग फटाके मार्केट येथील दुकानाना एनओसी देते. तसेच फटाक्याचा साठा रहिवासी क्षेत्रात विनापारवाना व कोणत्याही सुरक्षेविना ठेवल्याने, नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला. महापलिका व पोलिसांनी याविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र पोलीस व महापलिकेने संयुक्तपणे फाटक्याच्या विनापरवाना व रहिवासी क्षेत्रातील दुकानावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
३० दुकानाला परवानगी थाटली ६० दुकाने
शहरांत परवानाधारक दुकानाची संख्या एकूण ३० असल्याची माहिती महापालिका अग्निशमन विभाग व फटाके संघटनेचे अध्यक्ष सुरेश ठारवानी यांनी दिली. प्रत्यक्षात ६० पेक्षा जास्त फटक्याची दुकाने सजली असून अवैधपणे त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
रहिवासी परिसरात फटाक्याचे गोदाम
पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर रहिवासी क्षेत्रातील विनापरवाना व कोणत्याही सुरक्षाविना असलेल्या फटाके गोदामावर पोलिसांनी कारवाई केली. मात्र इतर रहिवासी क्षेत्रातील फटाके गोदामावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
क्षमतेपेक्षा जास्त फटाक्याचा साठा
नेहरू चौक परिसरात मुख्य मार्केट असून हजारो नागरिक खरेदी साठी याठिकाणी येतात. या वर्दळीच्या ठिकाणी फटाक्याचे दुकान असून दुकानात क्षमते पेक्षा कितीतरी पटीने जास्त फटाक्याचा साठा ठेवण्यात आला आहे.