शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

गुडविन ज्वेलर्सच्या संचालकांवर निगडीत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 20:35 IST

दुकान बंद करून सर्व आरोपी पळून गेल्याबाबतचा गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देया प्रकरणी योहन्नान थोमस (वय ६४, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पैसे परत न करता आरोपी दुकान बंद करून पळून गेले. पोलिसांनी संबंधितांना संपर्क केला असता ग्राहकांचे पैसे परत करणार असल्याचे सांगण्यात आले होते.

पिंपरी - सोने गुंतवूणक आणि फिक्स डिपॉझिट करायला सांगून गुडविन ज्वेलर्सच्या व्यवस्थापकीय संचालक, व्यवस्थापक आणि संचालकांनी ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक केली. दुकान बंद करून सर्व आरोपी पळून गेल्याबाबतचा गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी योहन्नान थोमस (वय ६४, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, गुडविन ज्वेलर्सचे व्यवस्थापक रितेश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), संचालक सुनील कुमार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), व्यवस्थापकीय संचालक सुधीर कुमार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), व्यवस्थापक रवी के नायर, सेतू पनीकर, संचालक आणि इतर सहकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी संगनमत करून फिर्यादी थॉमस आणि त्यांच्या पत्नीला सन २०१२ पासून २८ ऑक्टोबर २०१९ पर्यंत सोने गुंतवणुकीत आणि फिक्स डिपॉझिट या स्वरूपात पैसे गुंतवण्यास सांगितले. त्यानुसार, थॉमस आणि त्यांच्या पत्नीने २९ लाख रुपयांची गुंतवणूक केली.फिक्स डिपॉझिटचा कालावधी संपून देखील गुंतवलेले पैसे आरोपींनी थॉमस यांना परत केले नाहीत. पैसे परत न करता आरोपी दुकान बंद करून पळून गेले. इतर अनेक लोकांचीही आरोपींनी फसवणूक केली असल्याचे थॉमस यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. 

दरम्यान, गुडविन ज्वेलर्समध्ये गुंतवणूक केलेल्या ग्राहकांनी २२ ऑक्टोबर रोजी चिंचवड येथील गुडविन ज्वेलर्सच्या दुकानात गर्दी केली होती. त्यावेळी ग्राहकांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी संबंधितांना संपर्क केला असता ग्राहकांचे पैसे परत करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांनी संपूर्ण दिवस चिंचवड स्टेशन चौकातील गुडविन ज्वेलर्सच्या दुकानात घालवला. पण त्यांचे पैसे त्यांना मिळाले नाहीत. त्यानंतर, ३० ऑक्टोबर रोजी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीMumbaiमुंबईpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड