शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

घोषणाबाजी भोवली; आमदार, महापौरांसह २२ जणांविरुध्द गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 12:34 IST

जमावबंदी व साथरोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन

जळगाव : कोरोना रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात घोषणाबाजी, प्रशासनाचा निषेध केल्याच्या प्रकरणात आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे,भगत बालाणी, डॉ.राधेश्याम चौधरी यांच्यासह 22 जणांविरुध्द जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री जमावबंदी व साथ रोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाबाधित मालती नेहते या बेपत्ता वृध्देचा कोरोना रुग्णालयातील वॉर्ड क्र.७ मधील स्वच्छतागृहात मृतदेह आढळून आल्याने रुग्णालयाची अबु्र चव्हाट्यावर आली. सर्वच स्थरातून रुग्णालय प्रशासन व जिल्हाधिकाºयांविषयी रोष व्यक्त होत असताना आमदार सुरेश भोळे व महापौर भारती सोनवणे यांच्या नेतृत्वात बुधवारी दुपारी भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांनी रुग्णालयात अधीष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांचे दालन गाठून निवेदन दिले होते. यावेळी या पदाधिकाºयांनी तुम्ही कोरोन बाधित रुग्णांना सोडून देतात, त्यामुळे रुग्ण संख्या वाढत चालली आहे, याला रुग्णालय प्रशासन जबाबदार आहेत तसेच ‘भोंगळ कारभार करणारे अधीष्ठाता, जिल्हाधिकारी गो’ अशी घोषणाबाजी करुन निषेध व्यक्त करुन जोरजोरात आरडाओरड केली. विना परवानगी गर्दी व आंदोलन करु नये असे जिल्हाधिकाºयांचे आदेश असतानाही या पदाधिकाºयांनी कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार भटू नेरकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

यांच्याविरुध्द दाखल झाला गुन्हागुन्हा दाखल झालेल्यांमध्ये आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, नगरसवेक कैलास सोनवणे, स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा, मनपातील भाजप गटनेते भगत बालाणी, मनोज आहुजा, माजी नगरसेवक अतुल हाडा, नगरसेवक सुनील खडके, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महानगर सरचिटणीस डॉ.राधेश्याम चौधरी, अरविंद देशमुख, पिंताबर भावसार व इतर ८ ते १० जणांविरुध्द जमावबंदी आदेश उल्लंघन, भादवि कलम १८८, ११४३,२६९ अन्वये सह राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ब व साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम २,३ व ४ व महाराष्टÑ पोलीस कायदा कलम ३७ (१)(३)चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :MLAआमदारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस