शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

पाकिस्तानी क्रिकेटरविरोधात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी FIR, आता पोलिसांनी केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 17:12 IST

यासिरविरुद्ध गेल्या वर्षी 19 डिसेंबर रोजी इस्लामाबादमधील शालीमार पोलिस ठाण्यात 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि छळ करण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नवी दिल्ली - पाकिस्तानचा लेगस्पिन गोलंदाज यासिर शाह याला अल्पवयीन मुलीवरील कथित बलात्कार आणि अत्याचार प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी सांगितले की, यासिर आता १४ वर्षांच्या मुलीवर कथित बलात्काराच्या प्रकरणात संशयित आरोपी नाही. कारण यासिरचे नाव चुकून एफआयआरमध्ये जोडण्यात आल्याचे सांगत पीडितेने आपले म्हणणे मागे घेतले आहे. इस्लामाबाद पोलिसांनी ही माहिती दिली. यासिर शाहविरुद्ध गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कथित बलात्कार आणि छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.पोलिसांनी आपल्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे की, यासिर शाहचा या कथित बलात्कार प्रकरणाशी काहीही संबंध नाही. यासिर शाहचे नाव या खटल्यातून वगळण्याची विनंतीही तक्रारदाराने केली आहे. कथित बलात्कार प्रकरणात पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर यासिर शाहने ट्विट केले की, “सत्याचा विजय झाला आहे आणि आता मी माझ्यावर हा खटला दाखल करणाऱ्यांविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करणार आहे. माझ्यावर छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चाहते, कुटुंब आणि पीसीबी यांच्या पाठिंब्याने आणि प्रार्थनांमुळे त्याचा विरोध करता आला. त्यांच्या विश्वासाशिवाय हे शक्य झाले नसते."मी मानहानीचा खटला दाखल करणार : यासिरयासिरने पुढे लिहिले की, “मी पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करतो. अशा परिस्थितीत जो माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे, तो एका बाजूने देशाचे नाव देखील बदनाम करेल. या आरोपांनंतर मी खचून गेलो आहे. पण मी स्वतःला सावरले आणि न्यायालयाच्या माध्यमातूनच सत्य समोर आणण्यासाठी लढलो. तसेच, जे लोक आपल्या देशाचा द्वेष करतात, ते लोक त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी हे करू शकतात. मी मानहानीचा खटला दाखल करणार आहे. पाकिस्तान झिंदाबाद! 

यासिरविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलायासिरविरुद्ध गेल्या वर्षी 19 डिसेंबर रोजी इस्लामाबादमधील शालीमार पोलिस ठाण्यात 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि छळ करण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. एफआयआरमध्ये पीडितेने म्हटले आहे की, “यासिरचा मित्र फरहान याने बंदुकीच्या धाकावर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता आणि त्याचा व्हिडिओही रेकॉर्ड केला होता. यानंतर मी यासीरशी WhatsAppवर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली असता त्याने मला मदत करण्याऐवजी माझी चेष्टा केली आणि त्याला कमी वयाच्या मुली आवडतात, असे पीडितेने सांगितले.

 

टॅग्स :PoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPakistanपाकिस्तानCrime Newsगुन्हेगारी